साहित्य सरिता मंचतर्फे पुस्तकांचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:46 PM2019-09-14T22:46:35+5:302019-09-15T00:18:57+5:30

साहित्य सरिता मंचचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्योती गजभिये होत्या.

Publication of books by Sarita Sarita forum | साहित्य सरिता मंचतर्फे पुस्तकांचे प्रकाशन

साहित्य सरिता मंचतर्फे पुस्तकांचे प्रकाशन

googlenewsNext

एकलहरे : साहित्य सरिता मंचचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्योती गजभिये होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदी विद्यालय मुंबईचे डॉ. करुणाशंकर उपाध्याय, विशेष पाहुणे सहज ब्लोसम इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष सुशीलकुमार सक्सेना उपस्थित होते. यावेळी सृजन सरोवर, स्मृतियों में बसी काशी, बिन मुखोटो की दुनिया, राष्ट्रीय जननायक अ‍ॅडव्होकेट उज्ज्वल निकम या पुस्तकांचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. रोचना भारती, सुबोध मिश्रा, ज्योती गजभिये आणि बापू देसाई यांनी पुस्तकांवर विवेचन केले.
यावेळी सुधा झालानी, सुनीता माहेश्वरी आणि सुबोध मिश्र यांनी हिमाचल की एक लोककथा यावर नाटिका सादर केली. सुशीलकुमार सक्सेना तसेच डॉ. करुणाशंकर उपाध्याय यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. कार्यक्र माला रझाक शेख, स्मिता आर्य, वाय. जे. आर्य, रझिया सय्यद, वासुदेव वंजारी, वैशाली वंजारी, इर्शाद वसीम, रमेश सिंग, डॉ. जे. हंसवणी, श्रद्धा शिंदे, एस. के. शबनम, प्रभा शर्मा मुंबई, आराधना भास्कर मुंबई, सुनीता सारडा, सुनंदा मुठाळ, शशी सक्सेना, बापूराव देसाई, सी. बी. सिंग, छाया विधाते, संतोष अग्रवाल, नम्रता अग्रवाल, प्रकाश कदम, हरिकृष्ण माहेश्वरी, मिर्झा बेग, प्रदीप फणसळकर, सुप्रिया फणसळकर आदींसह साहित्यिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सी. पी. मिश्र यांनी केले, तर आभार भरतसिंग ठाकूर यांनी मानले.

Web Title: Publication of books by Sarita Sarita forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.