गावठाण क्लस्टरमध्ये चार एफएसआयचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:54 PM2020-10-03T23:54:00+5:302020-10-04T01:19:27+5:30

नाशिक- शहरातील गावठाण भागातील पडक्या वाड्यांची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने अखेरीस गावठाण क्लस्टर विकासासाठी आवश्यक असलेला आघात मुल्यमापन अहवाल शासनाकडे पाठविला आहे. त्यात गावठाणात चार एफएसआय (चटई क्षेत्र) प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, एक हजार चौरस मीटर क्षेत्रात चटई क्षेत्र असेल तरच क्लस्टर राबविण्यास परवानगी मिळणार आहे.

Proposal of four FSIs in Gaothan cluster | गावठाण क्लस्टरमध्ये चार एफएसआयचा प्रस्ताव

गावठाण क्लस्टरमध्ये चार एफएसआयचा प्रस्ताव

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाकडे लक्ष: एक हजार चौरस मीटरमध्येच मिळणार परवानगी

नाशिक- शहरातील गावठाण भागातील पडक्या वाड्यांची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने अखेरीस गावठाण क्लस्टर विकासासाठी आवश्यक असलेला आघात मुल्यमापन अहवाल शासनाकडे पाठविला आहे. त्यात गावठाणात चार एफएसआय
(चटई क्षेत्र) प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, एक हजार चौरस मीटर क्षेत्रात चटई क्षेत्र असेल तरच क्लस्टर राबविण्यास परवानगी मिळणार आहे.
गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून गावठाण भागातील जुन्या घरांच्या पुर्नविकासाचा प्रश्न प्रलंबीत आहे . त्यासाठी वेगवेगळ्या योजना
मांडण्यात आल्या परंतु त्या प्रत्यक्षात साकारल्या गेल्या नाहीत. दरम्यान, २०१७ मध्ये नाशिक महापालिकेसाठी विकास आराखडा तयार करताना गावठाण भागातील पुर्नविकासाची चर्चा सुरू झाली होती. त्यानुसार राज्य शासनाने शहर विकास आराखडा मंजुर करताना गावठाण भागासाठी क्लस्टर राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्वतंत्ररीत्या नियमावली निर्गमीत करण्यात येणर होती. मात्र, त्याच दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने महापालिकेला नाशिक शहरात गावठाण क्लस्टर राबविल्यास त्याचा
मुलभूत सेवा सुविधांवर काय परीणाम होईल हे जाणून घेण्यासाठी आघात मुल्यमापन अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते, मात्र वर्षभर हा विषय तेव्हा घोळातच राहीला. त्यानंतर तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यासाठी आर्थिक तरतूद केल्यानंतर निविदा मागवण्यात आल्या. त्यात क्रीसील कंपनीला काम देण्यात आले. परंतु हे काम करताना देखील अनेक अडचणी आल्या.
शहरातील पाच भागात ड्रोन सर्वे करण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी आधी पोलिस आणि नंतर डीजीसीएकडे पाठपुरावा करावा लागला. त्यांच्या अहवालानंतर स्थानिक गावठाणातील लोकप्रतिनिधींचे म्हणणे देखील ऐकून घेण्याची तरतूद असल्याने महापालिकेने तयारी केली. मात्र, लॉकडाऊनमध्ये त्यात व्यत्यय आला होता. मात्र, नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता राजू आहेर यांनी
आॅनलाईन मिटींग घेऊन त्यासंदर्भात अहवाल तयार केला. अखेरीस हा अहवाल आयुक्त कैलास जाधव यांच्या स्वाक्षरीने रवाना झाल्याचे वृत्त आहे. महापालिकेन आघात मुल्यमापन अहवालासह प्रस्ताव पाठविताना गावठाण भागात चार एफएसआय मिळावी अशी शिफारस केली आहे. सध्या गावठाणात दोन एफएसआय आहे. त्यात दोनने वाढ करण्यात आली आहे. तर एक हजार चौरस मीटर क्षेत्र असेल तरच त्याला क्लस्टरचे नियम लागू होणार आहेत.

गावठाणात दोन ऐवजी चार एफएसआय देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. अर्थात ती पूर्ण होत असली तरी दरम्यानच्या काळात वाहनतळ आणि अन्य नियमावली देखील मंजुर झाल्याने चार एफएसआय पूर्ण क्षमतेने वापरता येत नाही अशी एक तक्रार आहे. मात्र, आता नवीन युनीफाईड डीसीपीआर मंजुर होणार असून त्यात काही नियम बदलण्याची शक्यता असल्याने नक्की किती एफएसआय
वापरण्यास मिळतो याकडे लक्ष लागून आहे

 

Web Title: Proposal of four FSIs in Gaothan cluster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.