नाशिकच्या संशोधकाचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 05:55 AM2020-06-01T05:55:31+5:302020-06-01T05:55:59+5:30

आत्मनिर्भर भारतासाठी योगदान : सॅनिटायझर फवारणी यंत्राची पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मध्ये दखल

Prime Minister Modi praises Nashik researcher | नाशिकच्या संशोधकाचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

नाशिकच्या संशोधकाचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील शेतकरी, राष्ट्रपती पुरस्कार विजेते संशोधक राजेंद्र जाधव यांनी कोरोनाला रोखण्यासाठी अनोखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सॅनिटायझर फवारणी यंत्र विकसित केले आहे. या निर्मिती कार्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्र मात कौतुकोद्गार काढून जाधव यांचा गौरव केला आहे.
सरकारी यंत्रणेकडून कोरोनाविरोधात लढा सुरू आहे. तरी रस्ते, वसाहती, लिफ्ट, घरांचे दरवाजे, कम्पाउंड गेट, भिंती आदींना माणसांचा स्पर्श झाल्याशिवाय राहत नाही. अशा जागांवर निर्जंतुकीकरण महत्वाचे आहे. हे आव्हानात्मक काम मनुष्यबळाची कमतरता असल्याने पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे जाधव यांनी त्यांच्या शेतातील पिकांवर फवारणीसाठी यंत्र निर्मित केले होते. कोरोना काळात त्यांनी हे यंत्र प्रशासनाकडे दिले. या यंत्रामुळे कोरोना निर्जंतुकीकरणाच्या लढाईला बळ मिळाले. आत्मनिर्भर भारतासाठी हे मोलाचे योगदान असल्यानेच प्रधानमंत्री मोदी यांची दखल घेतली आहे.

अशी झाली
यंत्राची निर्मिती
अभियांत्रिकी शिक्षण झालेले
राजेंद्र जाधव यांनी ग्रामीण भागात सार्वजनिक स्वच्छता करण्यासाठी यंत्र विकसित करता येईल का, याविषयी संशोधन केले. यासाठी त्यांनी शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीचा वापर केला. अवघ्या पंचवीस दिवसांमध्ये जाधव यांनी ट्रॅक्टरवर बसवता येऊ शकेल, असे फवारणी यंत्र विकसित केले. या यंत्राच्या मदतीने रस्ते, सोसायट्या, दारे, कुंपणाच्या भिंती स्वच्छ
धुऊन काढणे शक्य आहे.

यंत्राच्या विकासासाठी सुमारे १.७५लाख रुपये खर्च आला आहे. या यंत्राचा वापर गावात जवळपास ३० किलोमीटर क्षेत्रामध्ये स्वच्छता करण्यासाठी केला जात आहे. कोरोनावर विजय मिळवून देणारे यंत्र असल्याने या यंत्राला ’यशवंत’ असे नाव दिले आहे. या अनोख्या फवारणी यंत्राच्या पेटंटसाठी म्हणजेच बौद्धिक स्वामित्वासाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच (एनआयएफ) नॅशनल इनोव्हेशन फाउण्डेशनकडेही त्याचे डिझाईन पाठवले आहे.
- राजेंद्र जाधव मिस्तरी, संशोधक

Web Title: Prime Minister Modi praises Nashik researcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.