मनमाडला अंगणवाडी सेविकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 06:52 PM2021-01-20T18:52:22+5:302021-01-20T18:53:43+5:30

मनमाड : येथील युवा सत्ता मंचच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुहास कांदे, प्रकल्प अधिकारी रमेश फडोळ उपस्थित होते.

Pride of Anganwadi workers to Manmad | मनमाडला अंगणवाडी सेविकांचा गौरव

मनमाड येथे अंगणवाडी सेविकांचा गौरव करताना आमदार सुहास कांदे, रमेश फडोळ. समवेत मयूर बोरसे, संतोष बळीद, स्वाती गुजराथी, आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देसरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात

मनमाड : येथील युवा सत्ता मंचच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुहास कांदे, प्रकल्प अधिकारी रमेश फडोळ उपस्थित होते.

दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. अंगणवाडी सेविका या अत्यंत महत्त्वाचे काम करीत असून, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार कांदे यांनी सांगितले. प्रकल्प अधिकारी फडोळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शुभम गायकवाड, स्वाती नरेश गुजराथी, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, उपजिल्हाप्रमुख संतोश बळीद, आदी उपस्थित होते. वाल्मिक रोकडे यांनी सूत्रसंचालन केले.
 

Web Title: Pride of Anganwadi workers to Manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.