Presenting demonstration of various Yogasanas with Suryanmasaka | सूर्यनमस्कारासह विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर
सूर्यनमस्कारासह विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर

नाशिक : जागतिक योग दिनानिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने आरोग्य जनजागृतीसाठी योग शिबिरे घेण्यात आली़ या शिबिरांमध्ये सूर्यनमस्कारासह योगासनांची विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली़ शाळांमध्येही योग दिन साजरा करण्यात आला़
एसएमआरके महिला महाविद्यालय
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला. योगसाधना केंद्राच्या योगशिक्षक ऋतुजा मसरानी यांनी अंग योगशास्त्राचे महत्त्व सांगितले. त्यांनी अनेक योगासने त्यांनी योग्य पद्धतीने विद्यार्थिनींकडून करून घेतली. प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे यांचे मार्गदर्शन कार्यक्र माला लाभले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपकार्यक्र म अधिकारी प्रा. डॉ. गीता यादव यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ. सतीश धनावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रभारी प्राचार्य साधना देशमुख, उपप्राचार्य डॉ. कविता पाटील, डॉ.नीलम बोकील, प्रा़ भारती सदावर्ते, प्राध्यापक वृंद व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
गौरी सामाजिक संस्था संचलित न्यू ग्रेस अकॅडमी
४म्हसरूळ येथील गौरी सामाजिक कल्याणकारी संस्था, नाशिक संचलित न्यू ग्रेस अकॅडमीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योगाविषयी, योगसाधना याविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्र माची सुरुवात योग प्रार्थनेने करत सूर्यनमस्कार घेण्यात आले. सूर्यनमस्काराचे महत्त्व योग प्रशिक्षक वैशाली पाटील यांनी समजावून सांगितले. योग प्रशिक्षक उत्कर्षा जोशी यांनी वेगवेगळे आसन प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर केले. शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी योग मुद्रांचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्र मांचे सूत्रसंचालन मानसी जोशी व पूनम काकड यांनी केले.
पंचवटी एज्युकेशन सोसायटी
४श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचलित विविध शाळांमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. मंडलेश्वर काळे, बन्सीधर तलरेजा, मोहन दांडगे यांनी योगा सादर केला. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र ठक्कर यांनी सरस्वतीचे पूजन केले. मुख्याध्यापक शरयू खैरे यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक धोपावकर यांनी ओमकार सादर केला. परेशभाई ठक्कर यांनी आभार मानले. याप्रसंगी महेंद्र गजेठीया, विजूभाई शहा, अनिल मेहता मुकेश गांधी, चंद्रकांत बटविद्या, किशोर बटाविया, लता पटेल, एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.
पंचवटी विद्यालय
४जनता सेवा मंडळ संचलित, पंचवटी विद्यालय समर्थनगर आणि नवचेतना विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन साजरा करण्यात आला़ यावेळी सुनीता पवार यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले़ यावेळी मुख्याध्यापक मेघा वाघ, राजाराम बोरसे आदींसह शिक्षक उपस्थित होते़
अमृतधाम वाचनालय
४आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमृतधाम वाचनालयातर्फे योगशिक्षक शरद शं़ जाधव यांनी योगाविषय मार्गदर्शन केले़ तसेच योग्य आहार कोणता? या विषयी माहिती दिली़ यावेळी योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली़ कार्यक्रमास जगन गोरे, दगा पाटील, विलास कारेगावकर, शरद सोमाशे, बोराडे, उदास आदी उपस्थित होते़
जिजामाता शाळेत योगासने, प्राणायाम
सातपूर कॉलनीतील मनपाच्या जिजामाता शाळा क्र मांक २८ मध्ये योगदिन साजरा करण्यात आला. आयुष मंत्रालय भारत सरकार इंटरनॅशनल नॅचरोपॅथी आॅर्गनायजेशन सूर्या फाउंडेशन व पतंजली योगविद्यापीठ यांचे संयुक्तरीत्या सामुदायिक योगासने व प्राणायाम करून घेण्यात आली. योगासनाची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. जिल्हा समन्वय डॉ. चेतना देवरे, दीपक मानकर, डॉ. रमाकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली योगशिक्षक सुरेश खांडबहाले, पतंजली योगविद्यापीठाचे योगगुरू शांताराम जोशी, दिनकर खर्डे, चारु लता शिरसाठ, रेणुका महाले, रेखा पाटील, कविता पाटील, प्रशांत चरपे, जगदीश जोशी यांनी योगासनाची माहिती दिली. योगाचे महत्त्व समजून सांगण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक छाया गोसावी, सोनजी गवळी, वैभव आहिरे, रेगजी वसावे, भारती पवार, सोनिया बोरसे, सोनाली कुवर, अनिल चव्हाण, सुरेश चौरे आदी उपस्थित होते़


Web Title:  Presenting demonstration of various Yogasanas with Suryanmasaka
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.