Prefer cashless transactions to prevent coronary infection; Due to ATMs, banks are also shrinking | कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कॅशलेस व्यवहारांना पसंती ; मुळे एटीएम, बँकांमध्येही शुकशुकाट

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कॅशलेस व्यवहारांना पसंती ; मुळे एटीएम, बँकांमध्येही शुकशुकाट

ठळक मुद्देनागरिकांकडून कॅशलेस व्याहराकांना पसंती संसर्ग टाळण्यासाठी एटीएम. बँकांकडे ग्राहकांची पाठ


नाशिक : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर नाशिक शहरातील सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी अधिक वाढविली असून, रस्त्यावर कामाशिवाय उतरणाºया नागरिकांना कर्तव्यावर असलेले कर्मचारी पोलिसी खाक्या दाखवत असल्याने शहरातील आर्थिक नस बनलेल्या बँका आणि एटीएममध्ये शुकशुकाट दिसून येत आहे.
कोरोनाच्या प्रभावामुळे शहरात असलेला पोलिसांचा बंदोबस्त आणि सोशल मीडियावर पोलिसांकडून नागरिकांना होणाºया मारहाणीचे व्हिडीओ यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण असून, सामान्य नागरिक बँका अथवा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठीही घराबाहेर पडताना दिसून येत नाही. त्याचप्रमाणे एटीएम मशीनच्या माध्यमातून संसर्ग होण्याची भीतीही नागरिकांमध्ये असल्याने अनेकजण रोखीचे व्यवहार करण्याऐवजी कॅशलेस, आॅनलाइन व्यवहार करण्यास पसंती देत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांचे प्रमाण वाढल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. देशात ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर रोख स्वरूपात चलन टंचाई निर्माण झाल्याने अचानक मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार वाढले होते. त्यानंतर बाजारात चलन प्रवाह सुरळीत झाल्यानंतर हे प्रमाण सामान्य झाले होते. यात पुन्हा वाढ झाली आहे. 
शहरात कोणतीही आपत्ती असली तरी सुरुवातीला हाताशी काही पैसे असावे म्हणून सर्वसामान्य नागरिकांकडून एटीएम, बँकांमधून पैसे काढण्याची लगबग सुरू होते. परंतु, देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतरही नागरिकांकडून एटीएममधून पैसे काढण्यापेक्षा कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असताना अनेक नागरिकांनी स्वत:हून एटीएममधून पैसे काढणे टाळण्यास सुरुवात केली आहे. एटीएममध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी येणाºया-जाणाºया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, प्रत्येकाचा स्पर्श मशीनला होत असतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेकजण एटीएमच्या माध्यमातून व्यवहार करणे टाळत आहे. पैसे काढण्यासाठी नेहमी ग्राहकांची गर्दी होणाºया शहरातील मध्यवर्ती भागातील एटीएममध्येही सध्या शुकशुकाट असून, कोणाकडूनही थेट नोटांच्या स्वरूपात रोख रक्कम घेण्याऐवजी मोबाइल अ‍ॅपचा वापर करणाºया ग्राहकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Web Title: Prefer cashless transactions to prevent coronary infection; Due to ATMs, banks are also shrinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.