कोटंबी येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 05:24 PM2020-10-01T17:24:43+5:302020-10-01T17:25:42+5:30

पेठ : तालुक्यातील ग्रामीण मुलांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाता यावे यासाठी वैभव सार्वजनिक वाचनालय व ग्रामस्थ यांच्या संयूक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले.

Pre-recruitment training at Kotambi | कोटंबी येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण

कोटंबी येथे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण प्रसंगी उपस्थित अनिल भूसारे व विद्यार्थी.

googlenewsNext
ठळक मुद्देपेठ : वैभव सार्वजनिक वाचनालयाचा अनोखा उपक्रम

पेठ : तालुक्यातील ग्रामीण मुलांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाता यावे यासाठी वैभव सार्वजनिक वाचनालय व ग्रामस्थ यांच्या संयूक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले.
कोटंबीचे रहिवासी व सद्या पोलीस सेवेत असलेले अनिल भूसारे यांनी मुलांना मैदानी सराव दिला. तसेच लेखी व तोडी परीक्षेला सामोरे जातांना करावयाच्या अभ्यासाबाबत माहीती दिली. यावेळी मुलांचा सराव पेपर घेउन त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. या परीक्षेत कोटंबी, उस्थळे, बर्डापाडा,गांगोडबारी व परीसरातील मुले सहभागी झाले होते.
याप्रसंगी ग्राम समन्वयक नरेंद्र भूसारे, शशिकांत भूसारे,भगवान चौधरी पुस्पराज भुसारे यांचे सह वाचनालय चे सदस्य उपस्थित होते.
 

Web Title: Pre-recruitment training at Kotambi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.