कोरोनाच्या सावटाखाली झाली एमपीएससीची पूर्व परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 04:58 PM2020-03-15T16:58:58+5:302020-03-15T17:03:09+5:30

: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सहायक मोटार वाहन निरीक्षक (एएमव्हीआय) पदासाठी रविवारी (दि.१५) नाशिक शहरातील ४१ परीक्षा केंद्रांवर १५ हजार ८४२ उमेदवारांपैकी १३ हजार ७३५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. तर कोरोनाच्या सावटाखाली झालेल्या या परीक्षेला कोरोनाच्या भीतीसोबतच विविध कारणांनी तब्बल दोन हजार १०७ उमेदवारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे.

Pre-examination of MPSC conducted under corona shadow | कोरोनाच्या सावटाखाली झाली एमपीएससीची पूर्व परीक्षा

कोरोनाच्या सावटाखाली झाली एमपीएससीची पूर्व परीक्षा

Next
ठळक मुद्देसहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षानाशिक शहरात 41 केंद्रावर परीक्षा दोन हजार 107 विद्यार्थ्यांची परीक्षेला दांडी

नाशिक : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सहायक मोटार वाहन निरीक्षक (एएमव्हीआय) पदासाठी रविवारी (दि.१५) शहरातील ४१ परीक्षा केंद्रांवर पूर्वपरीक्षा घेण्यात आली. संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस अर्थात कोव्हीड १९ विषाणूच्या सावटाखालीच शहरात ही एमपीएससीची परीक्षा पार पडली.
नाशिकमध्ये १५ हजार ८४२ उमेदवारांपैकी १३ हजार ७३५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. तर कोरोनाच्या सावटाखाली झालेल्या या परीक्षेला कोरोनाच्या भीतीसोबतच विविध कारणांनी तब्बल दोन हजार १०७ उमेदवारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. या परीक्षेसाठी राज्यातून साधारण ९५ हजार परीक्षार्थी बसले होते. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. या परीक्षेसाठी परीक्षार्थी सकाळी दीड तास आधी प्रवेशपत्र, ओळखपत्र व त्याच्या छायांकित प्रतीसह केंद्रावर हजर होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्गखोल्यांमध्ये परीक्षार्थींमध्ये अंतर ठेवण्यात आले होते. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नाशिक शहरातील ४१ केंद्र्रांवर ही परीक्षा घेतली. त्यासाठी १ हजार २५० कर्मचारी कार्यरत करण्यात आले होते. कोणत्याही केंद्र्रावर कॉपी वा अन्य गैरप्रकार आढळून आला नाही. विशेष म्हणजे सर्वच परीक्षा केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

Web Title: Pre-examination of MPSC conducted under corona shadow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.