येवल्यातील ५३ शाळांचा वीजपुरवठा खंडित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 10:55 PM2020-08-07T22:55:42+5:302020-08-08T01:06:27+5:30

येवला : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७२ शाळांपैकी १९ शाळांमध्ये अद्याप वीजजोडणीच नसून ५३ शाळांची वीजबिले थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून वीज नसताना या शाळांमध्ये तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पुरवलेले लेड टीव्ही, डिजिटल बोर्ड, संगणक आदी साहित्य पडून आहे.

Power supply to 53 schools in Yeola cut off! | येवल्यातील ५३ शाळांचा वीजपुरवठा खंडित!

येवल्यातील ५३ शाळांचा वीजपुरवठा खंडित!

googlenewsNext
ठळक मुद्देबिल थकले : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १९ शाळांमध्ये जोडणीच नाही

येवला : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७२ शाळांपैकी १९ शाळांमध्ये अद्याप वीजजोडणीच नसून ५३ शाळांची वीजबिले थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून वीज नसताना या शाळांमध्ये तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पुरवलेले लेड टीव्ही, डिजिटल बोर्ड, संगणक आदी साहित्य पडून आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंगणगाव केंद्रातील तळ्याचा माथा (धुळगाव), भारम केंद्रातील आडसुरेगाव, आढाव- कुºहेवस्ती, बोकटे केंद्रातील बोंबलेवस्ती, गणेशवाडी, गवंडगाव केंद्रातील महादेववाडी, कुसमाडी केंद्रातील सावखेडे, भगतवाडी, म्हसोबावाडी (कुसमाडी), म्हसोबावाडी (कुसुर), पाटोदा केंद्रातील डोहवस्ती, राजापूर केंद्रातील नाईकवस्ती, मल्हावाडी, दाणेवस्ती, वाघवस्ती, सावरगाव केंद्रातील गोपाळवाडी, म्हस्के वस्ती, गायरान वस्ती, मोठामळा या १९ शाळांना अद्यापपावेतो वीजजोडणीच नाही, तर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंदरसूल केंद्रातील फुलेवाडी, मन्याडथडी, दुर्गाभवानी वाडी, बजरंगवाडी, देवानंदवाडी, रामवाडी, शंकरवाडी, दळेवस्ती, भारम केंद्रातील तळवाडे, शिवाजीनगर (तळवाडे), रहाडी, महादेववाडी, विठ्ठलवाडी, कौटखेडे, डोंगरगाव, बोकटे केंद्रातील दुगलगाव, देवळाणे, चिचोंडी केंद्रातील हनुमानवाडी, महालखेडा, पाटोदा, निमगाव मढ, गवंडगाव केंद्रातील सुरेगाव रस्ता, भायखेडे, गारखेडे, पाणलोटवस्ती, कुसमाडी केंद्रातील अनकाई बारी, धामोडे, कुसमाडी, नगरसूल केंद्रातील हडपसावरगाव, लहित, बटवलवस्ती, गाडेवस्ती, कोळगाव, नागडे केंद्रातील कोटमगाव बुद्रूक व खुर्द, वडगाव, राजापूर केंद्रातील सोमठाणजोश, खिर्डीसाठे, जायदरे, लमाणतांडा, हनुमाननगर, सावरगाव केंद्रातील आंबेवाडी, कासारखेडा, गोरेवस्ती, गोपाळवस्ती, सोमठाणदेश केंद्रातील लौकी, शिरसगाव, मुरमी, निळखेडे, महादेव मंदिर, विखरणी, गायके- बागुल वस्ती, जगतापवस्ती, यवला मराठी केंद्रातील रेल्वे स्टेशन (येवला) या ५३ शाळांचे एकूण एक लाख ५८ हजार ११४ रुपये वीजबि ल थकल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.
शाळांसाठी व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जात असल्याने शाळा वीजबिल भरू शकली नसल्याचे कारण सांगितले जाते. तर या प्रश्नी वीज उपलब्ध करून देण्याची मागणी पालकांकडून केली जात असताना पर्यायी व्यवस्थेचा विचार करण्याची सूचना खुद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संबंधिताना केली होती. मात्र, अद्यापही या शाळांमध्ये वीजपुरवठा सुरू झालेला नाही. सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्या तरी गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न आहे.

येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये चौदाव्या किंवा पंधराव्या वित्त आयोग निधीतून सौर यंत्रणा बसविल्यास शाळांमध्ये वीज उपलब्ध होवून अध्यापनाचे काम सुरूळीत होईलच याबरोबरच वीज देयकांचा प्रश्नही राहणार नाही. जिल्हा परिषद मुख्य कायर्कारी अधिकारी यांना आपण या संदर्भात पत्र पाठवून याबाबत ग्रामपंचायतींना आपल्या स्तरावरून आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे.
- प्रविण गायकवाड, सभापती, पंचायत समिती, येवला

Web Title: Power supply to 53 schools in Yeola cut off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.