लॉकडाऊनमध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकणे ३१ ‘नेटिझन्स’ला भोवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 07:00 PM2020-07-09T19:00:34+5:302020-07-09T19:03:17+5:30

बेभानपणे व अतीउत्साहात कुठल्याही माहितीची खातरजमा न करता थेट समाजमाध्यमातील फेसबूक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटरसारख्या सोशलसाइट्सवर पोस्ट क रणे काही नेटिझन्सला महागात पडले.

Posting offensive posts in lockdown has shocked 31 'netizens'! | लॉकडाऊनमध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकणे ३१ ‘नेटिझन्स’ला भोवले!

लॉकडाऊनमध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकणे ३१ ‘नेटिझन्स’ला भोवले!

googlenewsNext
ठळक मुद्देसोशलमिडियाचा गैरवापर शहर व ग्रामीण सायबर पोलिसांकडून ‘दणका’

नाशिक : कोरोनाच्या संक्रमणकाळात लॉकडाऊन सुरू असताना जनसामान्यांपर्यंत अधिकृत शासकिय माहितीची कुठलीही खात्री व पडताळणी न करता चुकीची दिशाभूल करणारी माहिती सोशलमिडियाच्या माध्यमातून प्रसारित करणे शहरासह जिल्ह्यातील ३१ ‘नेटिझन्स’ला चांगलेच भोवले आहे. त्यांच्यावर शहर व ग्रामिण सायबर पोलिसांकडून थेट फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करत कारवाई करण्यात आली.
लॉकडाऊन काळात कधी मनपा आयुक्तांच्या नावाने तर कधी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने चुकीची माहिती सोशलमिडियावर पोस्ट करून व्हायरल केली गेली होती. जिल्हा माहिती कार्यालयाकडून वारंवार खुलासाही करण्यात आला आणि सदर संदेश चुुकीचा असून अशाप्रकारे ‘जिल्हाधिकाऱ्यांनी कुठलाही आदेश काढलेला नाही’ असे स्पष्ट केले गेले. बेभानपणे व अतीउत्साहात कुठल्याही माहितीची खातरजमा न करता थेट समाजमाध्यमातील फेसबूक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटरसारख्या सोशलसाइट्सवर पोस्ट करणे काही नेटिझन्सला महागात पडले. अशा महाभागांविरूध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा, कलम-१८८ व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये फौजदारी गुन्हे सायबर पोलिसांनी दाखल केले. शहरासह ग्रामिण भागातसुध्दा अशाप्रकारे प्रताप करणाºया नेटिझन्सची संख्या अधिक आहे.

ग्रामिण पोलिसांकडून २० गुन्ह्यांत ३७ संशयितांना अटक
ग्रामिण सायबर पोलिसांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत अशाप्रकारच्या २० लोकांविरूध्द गुन्हे दाखल करत ३७ संशयितांना अटकदेखील केली. तसेच नाशिक शहर सायबर पोलिसांनी ११ संशयितांवर अद्याप अशाप्रकारे कारवाई केली आहे. यामध्ये एकूण ८ पुरूष व १ महिलेला अटकदेखील करण्यात आली.

Web Title: Posting offensive posts in lockdown has shocked 31 'netizens'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.