बिनविरोध निवडणुकांमागेही राजकारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 11:25 PM2020-10-15T23:25:11+5:302020-10-16T02:06:18+5:30

नाशिक : महापालिकेच्या सहाही प्रभाग समिती सभापतीपदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून पंचवटी, नाशिक पूर्व व सातपूर या तीन ठिकाणी भाजपाला संधी ...

Politics even after unopposed elections! | बिनविरोध निवडणुकांमागेही राजकारण!

बिनविरोध निवडणुकांमागेही राजकारण!

Next
ठळक मुद्देप्रभाग समिती निवडणूक: जयश्री खर्जुल, वैशाली भोसले, धिवरे यांची बाजी

नाशिक : महापालिकेच्या सहाही प्रभाग समिती सभापतीपदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून पंचवटी, नाशिक पूर्व व सातपूर या तीन ठिकाणी भाजपाला संधी मिळाली आहे तर शिवसेनेकडे सिडको आणि नाशिकरोडला संधी मिळाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पश्चिम प्रभाग समितीवर सत्ता मिळाली आहे. शिवसेनेने भाजप आणि कॉग्रेस, राष्ट्रवादीला धोबीपछाड देण्यासाठी केलेली खेळी सातपूरला अयशस्वी ठरली असली तरी नाशिकरोड येथे मात्र भाजपाने ज्या डॉ. सीमा ताजणे यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षादेश झुगारून माघार घेतल्याने शिवसेनेच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आॅनलाईन पध्दतीने झालेल्या निवडणूकीत तीन प्रभाग समिती सभापती अगोदरच एकमेव अर्ज असल्याने बिनविरोध निवडले गेले होते. यात नाशिक पूर्व मध्ये भाजपाचे अ­ॅड. श्याम बडोदे, पंचवटी प्रभागात याच पक्षाच्या शीतल माळोदे आणि सिडको प्रभाग समितीत चंद्रकांत खाडे यांच्या औपचारीक निवडीची घोषणा गुरूवारी (दि.१५) पार पडली. उर्वरीत
तीन ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतीपदी मनसेच्या अ­ॅड. वैशाली भोसले, नाशिकरोडला जयश्री खर्जुल यांची निवड करण्यात आली आहे.
महापौरपदाच्या निवडणूकीचे आणि आगामी महापालिकेच्या निवडणूकांचे सावट असलेल्या या निवडणूकीत अवघे पाच महिने कालावधीसाठी फार स्पर्धा नसली तरी राजकारण मात्र जोरात चालले. महापालिकेच्या राजीव गांधी भवनातून संचलीत या निवडणूकीत त्याचा प्रत्यय आला.
नाशिकरोड प्रभाग समितीत शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी अकरा अकरा नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेनेला सत्ता मिळू शकणार होती. आता शिवसेनेत असलेले भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या समर्थक मानल्या जाणा-या डॉ.सीमा ताजणे तसेच मीरा हांडगे या भाजपाकडून इच्छुक होत्या. वाद आणि फुट टाळण्यासाठी भाजपने डॉ. सीमा ताजणे यांना उमेदवारी दिली. इतकेच नाही तर त्यांच्या नावाचा पक्षादेश देखील काढला होता. मात्र उमेदवारी मिळालेल्या डॉ. सीमा ताजणे यांनीच माघार घेतल्याने शिवसेनेच्या जयश्री खर्जुल बिनविरोध निवडून आल्या. अर्थात, हे वरकरणी राजकारण दिसत असलेतरी जगदीश पवार यांना आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू होते. त्यातही हांडगे यांच्यासाठी काही नेते प्रयत्न करीत होते.
पवार यांना वळविणे शक्य न झाल्याने ऐनवेळी म्हणजे निवडणुूकीसाठी सभागृहात जाताना ताजणे यांना उमेदवारी देण्यात आल्याचा मॅसेज देण्यात आला. त्यातच विशाल संगमनेरे हे विदेशात असल्याने आॅनलाईन निवडणूकीत सहभागी होण्यात अडचण येत होती. त्यामुळे डॉ. ताजणे यांनी माघार घेतल्यचे समजते. त्यांची माघार पक्षाला सांगूनच झाल्याचा दावा गटनेता जगदीश पाटील यांनी केला आहे.

पश्चिम प्रभागात भाजपचे वर्चस्व नसून तेथे कॉँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेचे अधिक सदस्य आहेत. या प्रभागात मनसेच्या अ­ॅड. वैशाली भोसले, भाजपाच्या स्वाती भामरे आणि कॉँग्रेसच्या मावळत्या सभापती वत्सला खैरे इच्छुक होत्या. शिवसेनेने अ­ॅड. भोसले यांना पाठींबा दिला होता. कारण त्यांनी महापौरपदाच्या निवडणूकीत सेनेला अखेरपर्यंत साथ दिल्याने त्यांना समर्थन दिले होते. मनसेकडूनही अ­ॅड. भोसले यांनाच समर्थन देण्यात आल्याने त्यांचा विजय सहज झाला. भामरे आणि खैरे यांना माघार घ्यावी लागली.

सातपूरमध्ये भाजपाच्या मित्रपक्षाच्या दीक्षा लोंढे यांना उमेदवारी देऊन शिवसेनेने खेळी करण्याचा प्रयत्न केला होता. याठिकाणी भाजपचे
रविंद्र धिवरे आणि मनसेचे योगेश शेवरे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, मनसेने भाजपाच्या धीवरे यानां पाठींबा दिल्याने बहुमत नसताना देखील ही समिती भाजपाकडे गेली तर शिवसेनेच्या या आधी हातात असलेली समिती गेली. लोंढे आणि शेवरे यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक देखील बिनविरोध झाली. 

निवडणूक आॅनलाईन तरीही प्रत्यक्ष उपस्थिती कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रथमच आॅनलाईन पध्दतीने निवडणूका घेण्यात
आल्या. नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची गर्दी टाळण्यसाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, निवडणूकीत सहभागी होताना तांत्रीक अडचणी आणि लिंक जोडण्यातील अडचणी यामुळे अनेक नगरसेवक नियोजीत निवडणूकीत वेळी कार्यालयात
दाखल झाले. काही सदस्य मात्र आॅनलाईनच निवडणूकीत सहभागी झाले.

मनसेची टाळी सेनेला नाही
मनसेला पश्चिम प्रभागात पाठींबा देणाऱ्या शिवसेनेला सातपूर प्रभागात मनसेकडून पाठबळाची अपेक्षा होती. मात्र या पक्षाने भाजपाला साथ दिल्याने दीक्षा लोंढे यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे तेथे सेनेची खेळी वाया गेली. नाशिकरोडला मात्र सेनेचे राजकारण कामी आले.
 

 

 

Web Title: Politics even after unopposed elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.