हरसुलला पोलिसांनी केला अवैद्य मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 02:19 PM2020-02-28T14:19:17+5:302020-02-28T14:21:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क! वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : हरसूल पोलिसांना गुरुवारी (दि.२७) मध्यरात्रीच्या सुमारास मिळालेल्या गोपीनिय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत कारसह ६ लाख ४७ हजार ४० रु पयांचा मद्यासाठा अवैद्यरित्या माल हरसूल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

 Police seize illegal liquor in Harsul | हरसुलला पोलिसांनी केला अवैद्य मद्यसाठा जप्त

हरसूल पोलिसांनी वाहनासह जप्त करण्यात आलेला मुद्देमाल.

googlenewsNext
ठळक मुद्दे पोलीस कर्मचारी जखमी : अंधाराचा फायदा घेत चालक फरारमात्र यावेळी कारच्या धडकेने पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, हरसूल येथील ग्रामीण रु ग्णालयातील उपचारानंतर त्यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरात हरसूल पोलिसांनी तीन वाह


हरसूल पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरु वारी (दि. २७) रोजी पहाटे १.५० वाजेच्या सुमारास ठाणापाडा कडून अवैद्य मद्याची वाहतूक करणारे वाहन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने हरसूल येथील शनी मंदिर चौकातील मुख्य रस्त्यावर पोलीस कर्मचारी बॅरिगेटिंग लावत असताना अचानकपणे अवैद्यरित्या वाहतूक करणाºया वाहनाने धडक दिल्याने पोलीस हवालदार ए. बी. भोये यांच्या तोंडाला, डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले. तर पोलीस हवालदार डी. ए. बोडके यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.
यावेळी मद्य वाहतूक तस्कराने याचा फायदा घेत हरसूल गावातील इंदिरानगर झोपटपट्टीत बेवारसपणे स्विफ्ट कार (डी. एन. ०९, के व्ही ०४७३) सोडून पलायन केले. हरसूल पोलिसांनी या वाहनांची तपासणी केली असता मुद्देमाल आढळून आला. याबाबत हरसूल पोलीस स्टेशनला अनोळखी चालकाविरु द्ध मुंबई दारूबंदी अधिनियम कलामान्वये व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली कार सिल्व्हासा येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिह, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शिर्मष्ठा वालावलकर, उप विभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले, पोलीस कर्मचारी डी. ए. बोडके, रतन शिंगाडे, मोहित सोनवणे, के. के. भोये, सुनील तुंगार, उमेश बच्छाव आदींनी ही कारवाई केली.
 

Web Title:  Police seize illegal liquor in Harsul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.