‘त्या’ सहा संशयित गुंडांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:10 AM2020-01-13T01:10:45+5:302020-01-13T01:11:13+5:30

दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसमध्ये झालेल्या पार्टीदरम्यान दहा ते पंधरा संशयित गुंडांनी साउंडसिस्टिम वाजविणाऱ्या दोघा तरुणांना अमानुष मारहाण व लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेप्रकरणी या गुन्ह्यातील सहा संशयित गुंडांना रविवारी (दि.१२) तालुका पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आले.

Police detain six suspected gangsters | ‘त्या’ सहा संशयित गुंडांना पोलीस कोठडी

संशयितांना ताब्यात घेताना पोलीस.

Next
ठळक मुद्देफार्महाउस लैंगिक छळ प्रकरण : आणखी एका संशयिताला बेड्या

नाशिक : दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसमध्ये झालेल्या पार्टीदरम्यान दहा ते पंधरा संशयित गुंडांनी साउंडसिस्टिम वाजविणाऱ्या दोघा तरुणांना अमानुष मारहाण व लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेप्रकरणी या गुन्ह्यातील सहा संशयित गुंडांना रविवारी (दि.१२) तालुका पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आले. एकूण सात संशयितांच्या मुसक्या आवळल्या गेल्या असून, मुख्य सूत्रधार सराईत गुन्हेगार संदेश काजळे हा अद्याप फरार आहे.
फार्महाउसवर मद्यसेवन करून दोघा तरुणांना अमानुष मारहाण करत अनैसर्गिक अत्याचाराची घटना शनिवारी उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलीस दल हलले. तपासाला गती देत पोलिसांनी या गुन्ह्यात सहा संशयितांना शनिवारी रात्री उशिरापर्यंत अटक केली. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संशयित प्रीतेश काजळे, संदेश वाघ, अभिषेक शिरसाट, रोहित डोळस, संदीप भवाळकर, निखिल महेंद्र पवार यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. तसेच रविवारी सातवा संशयित प्रकाश बाळू वाघ (रा. शुभम पार्क) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुंडांच्या टोळीविरुद्ध विविध कलमान्वये दाखल करण्यात आले आहे. मुख्य सूत्रधारासह उर्वरित सहा ते सात संशयित गुंडांचा पोलीस शोध घेत आहेत.
दरी शिवारात निखिल पवार याच्या फार्महाउसवर गुरु वारी (दि.९) रात्रभर ओल्या पार्टीचा धिंगाणा चालला होता, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
दोघा तरुणांनी नियमानुसार रात्री दहा वाजता डीजे बंद केल्यानंतर पंधरा संशयित गुंडांच्या टोळीने त्यांना विवस्त्र करून शरीरावर थंड पाणी टाकत पट्ट्याने अमानुष मारहाण तसेच विजेचे शॉकदेखील दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोघा पीडित तरुणांनी आपली कशीबशी गुंडांच्या तावडीतून शुक्र वारी (दि.१०) सकाळी सुटका करून घेतली. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला.

Web Title: Police detain six suspected gangsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.