शहरात पोलिसांची नाकाबंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 10:38 PM2020-03-24T22:38:04+5:302020-03-25T00:18:11+5:30

राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी लागू करूनही विनाकारण रस्ते, चौकांमध्ये गर्दी करणाºया नागरिकांना आवरण्यासाठी पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करून रस्ते अडविले असून, मंगळवारी रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना माघारी फिरविण्याबरोबरच काहींना लाठीचा प्रसाद देण्याची कारवाईही करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात खºया अर्थाने संचारबंदीचा प्रत्यय आला आहे.

Police blockade in city! | शहरात पोलिसांची नाकाबंदी !

शहरात पोलिसांची नाकाबंदी !

Next
ठळक मुद्दे रस्ते, चौक बंद : विनाकारण गर्दी करणाऱ्यांना लाठीचा प्रसाद

नाशिक : राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी लागू करूनही विनाकारण रस्ते, चौकांमध्ये गर्दी करणाºया नागरिकांना आवरण्यासाठी पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करून रस्ते अडविले असून, मंगळवारी रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना माघारी फिरविण्याबरोबरच काहींना लाठीचा प्रसाद देण्याची कारवाईही करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात खºया अर्थाने संचारबंदीचा प्रत्यय आला आहे.
रविवारी जनता संचारबंदीच्या काळात स्वत:ला घरात कोंडून घेणाºया नागरिकांनी मात्र सायंकाळनंतर घराबाहेर पडून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याऐवजी त्याविषयी बेफिकिरीचे प्रदर्शन घडविले. सोमवारीदेखील हजारो नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र होते. सकाळपासूनच दुचाकी, चारचाकी वाहनांतून तर काहींनी पायीच गंमत पाहण्यासाठी घराबाहेर पडले. सरकारने फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची अनुमती दिलेली असताना ते बंधन झुगारून अनेकांनी आपापली दुकाने उघडून ग्राहकांना प्रोत्साहित केले होते. हजारोंच्या संख्येने जत्थेच्या जत्थे रस्त्यावर उतरल्याने आरोग्य यंत्रणेने भीती व्यक्तकेली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता, घरातच थांबणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांनी स्वत:बरोबरच अन्य लोकांचाही जीव धोक्यात घालणे सुरू केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळनंतर संचारबंदी लागू केल्याची घोषणा केली. त्यामुळे रात्रीपासूनच पोलिसांना रस्त्यावर उतरून गर्दीला आवर घालण्याची कार्यवाही करावी लागली. शहरातील प्रमुख रस्ते, चौकाचौकांत लोखंडी बॅरिकेट््स टाकून थेट रस्तेच बंद करून पोलिसांनी रस्त्याचा ताबा घेतला. मंगळवारी सकाळी याचा फटका अनेकांना बसला. दूध, भाजीपाला विक्रेत्यांना त्यातून वगळण्यात आले मात्र अन्य व्यक्ंितना पोलिसांनी अटकाव केला. शहरातील पंचवटी, सिडको, नाशिकरोड, सातपूर, पाथर्डी, अंबड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, महात्मा गांधीरोड, गोदाघाट आदी भागांतील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने शहरात संचारबंदीची परिस्थिती दिसून आली, तर याच वेळी विनाकारण फिरणाºयांना पोलिसांनी हिसकादेखील दाखविला.
जीवनावश्यक
वस्तू मुबलक
कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी, जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये म्हणून प्रशासनाने भाजीपाला, दूध, फळे, औषधे दुकानांना त्यातून वगळल्याने नागरिकांचे हाल टळण्यास मदत झाली. मंगळवारी शहर, परिसरात अन्य दुकाने पूर्णपणे बंद असली तरी, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी होती व त्यात मुबलक साठादेखील होता. त्यामुळे नागरिकांना टंचाईचा सामना करण्याची वेळ आली नाही.

Web Title: Police blockade in city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.