गिर्यारोहकाला पोलिसांनी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:57 AM2019-08-24T00:57:06+5:302019-08-24T00:57:37+5:30

पांडवलेणीच्या डोंगरावर गिर्यारोहणासाठी गेलेला इसम पाय घसरून पडल्याने डोंगरावरच अडकून पडला. त्यास जखमी अवस्थेत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल व वैनतेय गिर्यारोहक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वीपणे वाचविले आहे.

 Police arrested the arrester | गिर्यारोहकाला पोलिसांनी वाचविले

गिर्यारोहकाला पोलिसांनी वाचविले

Next

इंदिरानगर : पांडवलेणीच्या डोंगरावर गिर्यारोहणासाठी गेलेला इसम पाय घसरून पडल्याने डोंगरावरच अडकून पडला. त्यास जखमी अवस्थेत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल व वैनतेय गिर्यारोहक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वीपणे वाचविले आहे.
पांडवलेणीपर्यंत जाण्यास पर्यटकांना मुभा आहे, मात्र लेणी ओलांडून राखीव वनक्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करून डोंगर सर करण्यास वन कायद्यानुसार गुन्हा आहे. तरीही हौशी गिर्यारोहकांकडून डोंगर सर करण्याच्या नादात धोकादायक ठिकाणी प्रवेश करण्याचे प्रयत्न केले जात असून, त्यामुळे वारंवार दुर्घटना घडण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पांडवलेणी येथील निसर्गरम्य ठिकाणी शुक्रवार (दि. २३) रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास सिडकोतील उत्तमनगर येथे राहणारे बाळासाहेब सुरसे (५२) यांनी पांडवलेणीचा डोंगर सर केला, परंतु उतरण्याच्या वेळी पाय घसरल्याने ते सुमारे पंचवीस ते तीस फूट घसरत खाली पडले. त्याठिकाणी कोणीच नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. परंतु दहा वाजण्याच्या सुमारास एक पर्यटक त्याबाजूने जात असताना त्याला सुरसे हे जखमी अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी तातडीने पोलीस कंट्रोल रूमला घटनेची माहिती दिली.
इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल राजेंद्र राजपूत, राजेश निकम व वैनेतय गिर्यारोहक संस्थेचे चेतन खर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डोंगरावर जाऊन जखमी बाळासाहेब सुरसे यांना डोंगरावरून खाली आणले. सुरसे यांच्या हाता-पायास मुक्का मार लागला असून, अनेक ठिकाणी ओरखडले आहे. तसेच त्यांचा डावा पाय फॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना औषधोपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

Web Title:  Police arrested the arrester

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.