बोकटे-ओगदी-अंदरसूल रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:02 AM2020-11-24T00:02:16+5:302020-11-24T02:15:40+5:30

येवला : तालुक्यातील बोकटे-ओगदी, बोकटे-अंदरसूल रस्ता कामाची चौकशी करण्यात येऊन या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी बोकटे ग्रामस्थांनी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Plight of Bokte-Ogdi-Andarsul road | बोकटे-ओगदी-अंदरसूल रस्त्याची दुर्दशा

बोकटे-ओगदी-अंदरसूल रस्त्याची दुर्दशा

Next
ठळक मुद्देयेवला : कामाच्या चौकशीची मागणी; भुजबळांना निवेदन

येवला : तालुक्यातील बोकटे-ओगदी, बोकटे-अंदरसूल रस्ता कामाची चौकशी करण्यात येऊन या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी बोकटे ग्रामस्थांनी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दळण-वळणासाठी अत्यंत महत्त्वाचा बोकटे-ओगदी, बोकटे- अंदरसूल रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शालेय बस बंद असल्याने शाळकरी मुलांची मोठी गैरसोय होत आहे. तर शेतकर्‍यांना आपला शेतमाल वाहतुकीसाठीही अडचण होते. रस्ता कामे मंजूर असल्याची चर्चा आहे, मात्र अद्यापही काम पूर्ण नसल्याने या रस्त्यांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, असे सदर निवेदनात म्हटले आहे.

बोकटे गावाजवळील बोकटे-ओगदी हा मुख्य रस्ता काही अंतर वगळता भारत स्वतंत्र झाला तरी डांबरीकरण झाला नसल्याने बोकटे-ओगदी आणि बोकटे- अंदरसूल रस्त्याचे पक्के खडीकरण आणि डांबरीकरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तालुकाध्यक्ष हितेश दाभाडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कदम, राहुल लासुरे, नामदेव माळी, दामोधर दाभाडे, कारभारी मोरे, दीपक साळवे, लहू निकम, रामनाथ दाभाडे, नवनाथ दाभाडे, रवींद्र साठे, ताराचंद मोरे, भैरवनाथ दाभाडे, संजय दाभाडे, ज्ञानेश्वर निकम, अरुण दाभाडे, रमेश निकम, प्रकाश मोरे, गुलाब दाभाडे, वसंत दाभाडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Web Title: Plight of Bokte-Ogdi-Andarsul road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.