नांदूरवैद्य येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्लास्टिकमुक्त अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 07:40 PM2019-09-21T19:40:29+5:302019-09-21T19:41:24+5:30

नांदूरवैद्य : गावात स्वच्छता राखण्यासाठी प्लास्टिकमुक्त अभियानाअंतर्गत प्लास्टिक जमा करून विल्हेवाट लावण्यात आली.

Plastic free campaign started in the presence of villagers at Nandurvadi | नांदूरवैद्य येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्लास्टिकमुक्त अभियानास प्रारंभ

नांदूरवैद्य येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्लास्टिकमुक्त अभियानास प्रारंभ

Next
ठळक मुद्देपरिसरातील प्लास्टिक जमा करून विल्हेवाट लावण्यात आली

नांदूरवैद्य : गावात स्वच्छता राखण्यासाठी प्लास्टिकमुक्त अभियानाअंतर्गत प्लास्टिक जमा करून विल्हेवाट लावण्यात आली.
स्वच्छ भारत अभियानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकमुक्त अभियान सुरु केले असून ग्रामस्थांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात परिसरातील प्लास्टिक जमा करून विल्हेवाट लावण्यात आली आहे.
येत्या २ आॅक्टोंबरला राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जयंती आहे. या निमित्ताने देशभरात प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर नांदूरवैद्य येथे दोन दिवसापूर्वी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. व प्लास्टिकमुक्त गाव करण्याचा ठराव ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता. ग्राम अधिकारी किरण शेलावणे व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत प्लास्टिकमुक्त अभियानास सुरु वात करण्यात आली. त्यावेळी प्लास्टिकमुक्त गाव हा ठराव मंजूर करण्यात आला होता.
नांदूरवैद्य येथील भैरवनाथ महाराज मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, तसेच मुख्य रस्त्यावरील प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आदी प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू ग्रामस्थांनी गोळा करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. या प्लास्टिकमुक्त अभियानात ग्राम अधिकारी किरण शेलावणे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपसरपंच पोपटराव दिवटे, विविध विकास कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष मोहन करंजकर, रामदास दवते, अशोक कर्पे, माजी सरपंच रामचंद्र दिवटे, माजी उपसरपंच सिताराम मुसळे, निवृत्ती मुसळे, भाऊसाहेब मुसळे, दिनेश दवते, ग्रामपंचायत सदस्य नितीन काजळे, कुंडलिक मुसळे, बापू मालूंजकर, लक्ष्मण मुसळे, रामकृष्ण दवते, मारूती डोळस, माधव कर्पे आदी उपस्थित होते.

(फोटो २१ नांदूरवैद्य, २१ नांदूरवैद्य १)
नांदूरवैद्य येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील तसेच गावातील इतर ठिकाणचे प्लास्टिक ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जमा करून विल्हेवाट लावण्यात आली त्याप्रसंगी उपसरपंच पोपटराव दिवटे, ग्राम अधिकारी किरण शेलावणे व ग्रामस्थ.

Web Title: Plastic free campaign started in the presence of villagers at Nandurvadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.