प्रजासत्ताक दिनानिमित्त १५० वृक्ष रोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 06:47 PM2021-01-28T18:47:08+5:302021-01-28T18:49:28+5:30

पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायतीच्या अभिनव उपक्रमातून तसेच माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पिंपळगाव बसवंत परिसरात १५० वृक्ष ...

Planting of 150 saplings on the occasion of Republic Day | प्रजासत्ताक दिनानिमित्त १५० वृक्ष रोपांची लागवड

पिंपळगाव बसवंत : माझी वसुंधरा अभियानांतर्गत निसर्ग वाचविण्याचे आवाहन

Next
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : माझी वसुंधरा अभियानांतर्गत निसर्ग वाचविण्याचे आवाहन

पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायतीच्या अभिनव उपक्रमातून तसेच माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पिंपळगाव बसवंत परिसरात १५० वृक्ष रोपांची लागवड व श्रमदान शिबिर संपन्न झाले.

आमदार दिलीप बनकर यांची प्रमुख उपस्थिती व ग्रामपालिकेच्या सरपंच अलका बनकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी जलशुद्धीकरण केंद्र परिसरात साफसफाई करण्यात आली. निसर्गाचा समतोल ठेवण्यास मदत करणाऱ्या दीडशे वृक्ष रोपांची लागवड करून संविधान व माझी वसुंधरा अंतर्गत हरित शपथ उपस्थितांना देण्यात आली.
            याप्रसंगी महसूल विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, विधुत महामंडळ विभागातील अधिकारी कर्मचारी,अंगणवाडी सेविका, आशावर्कर, जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आदींनी या श्रमदान शिबिरात सहभाग नोंदवला. याप्रसंगी सुरेश खोडे, संपत विधाते, विश्वास मोरे, बाळासाहेब बनकर, उपसरपंच सुहास मोरे, जिल्हा परिषद सदस्य मंदाकिनी बनकर, मंडल अधिकारी नीळकंठ उगले, तलाठी राकेश बच्छाव, उमेश जैन, ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर, संजय मोरे, अल्पेश पारख, विद्या घोडके, सत्यभामा बनकर, शितल विधाते, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत पिंपळगाव शहरातील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाची शपथ घेताना दिलीप बनकर, अलका बनकर, उपसरपंच सुहास मोरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर, संजय मोरे ,सुरेश कोडे आदी.

Web Title: Planting of 150 saplings on the occasion of Republic Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.