पिकअप जीपची दुचाकीला धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 07:12 PM2020-07-12T19:12:04+5:302020-07-12T19:12:27+5:30

मयत विजय धुमाळ याच्या पश्चात पत्नी, आई, वडिल, दोन भाऊ असा परिवार असून दीड महिन्यांपूर्वी विजयचा विवाह झाला होता.

Pickup jeep hits two-wheeler; One killed | पिकअप जीपची दुचाकीला धडक; एक ठार

मयत विजय धुमाळ

googlenewsNext
ठळक मुद्देअमृतधाम तारवाला लिंकरोडवरील घटना

पंचवटी : दुकान बंद करून घराकडे परतणाऱ्या ऍक्टिव्हा दुचाकीला अमृतधाम तारवाला लिंकरोडवर समोरून येणाऱ्या भरघाव पिकअप जीपने जबर धडक दिल्याने दोघा सख्ख्या भावंडांचा अपघात घडला. सदर अपघातात एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर पिकअप घटनास्थळापासून 100 फूट झाडाझुडुपांत अडकली होती. अपघातानंतर चालकाने गाडी सोडून पलायन केले.
सदर अपघातात जुना गंगापूर नाका परिसरात राहणारा विजय शंकर धुमाळ (29) जागीच ठार झाला तर त्याचा लहान भाऊ संजय शंकर धुमाळ जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत अजय धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी पोलिस ठाण्यात पिकअप चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुमाळ बंधू यांनी काही दिवसांपूर्वी आडगाव शिवारात खाद्य पदार्थ हातगाडी सुरू केली होती. काल रात्री दुकान बंद करून दोघे ऍक्टिव्हावरून (एम एच 15 इ झेड 9527) अमृतधाम तारवालानगर लिंकरोडने घराकडे जात असतांना तारवालानगरकडून अमृतधामकडे भरघाव वेगाने जाणाऱ्या पिकअप गाडीने
भास्कर प्लॅनेट इमारती समोर रस्त्यावर (एम एच15 एफ व्ही 1818) समोरून जबर धडक दिली त्यात दोघेजण गाडीवरून खाली पडले त्यात विजयच्या डोक्याला हाता पायाला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला तर संजय जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाचे तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला पोलिस वाहनातून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले होते.
मयत धुमाळ याच्या पश्चात पत्नी, आई, वडिल, दोन भाऊ असा परिवार असून दीड महिन्यांपूर्वी विजयचा विवाह झाला होता.

Web Title: Pickup jeep hits two-wheeler; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.