मखमलाबाद येथील स्मार्ट प्रकल्पाविरोधातील याचिकेची १ फेब्रुवारीस सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 07:35 PM2020-01-13T19:35:30+5:302020-01-13T19:37:32+5:30

नाशिक-  स्मार्ट सिटी अतंर्गत मखमखलाबाद येथे साकारण्यात येणाºया हरीत विकास प्रकल्पास विरोध करणाºया शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर १ फेब्रुवारीस सुनावणी होणार आहे.

Petition hearing against smart project in Makhlamabad on February 7 | मखमलाबाद येथील स्मार्ट प्रकल्पाविरोधातील याचिकेची १ फेब्रुवारीस सुनावणी

मखमलाबाद येथील स्मार्ट प्रकल्पाविरोधातील याचिकेची १ फेब्रुवारीस सुनावणी

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांचा विरोधस्थगिती देण्याची मागणी

नाशिकस्मार्ट सिटी अतंर्गत मखमखलाबाद येथे साकारण्यात येणाºया हरीत विकास प्रकल्पास विरोध करणाºया शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर १ फेब्रुवारीस सुनावणी होणार आहे.

नाशिक शहरातील मौजे नाशिक आणि मौजे मखमलाबाद येथील एकुण ३०६ हेक्टर क्षेत्रात हरीत विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. परंतु यासंदर्भात शेतक-यांचे दोन गट पडले आहेत. पैकी ४३४ शेतकºयांनी या प्रकल्पाला विरोध करण्याचे निवेदन आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले. त्याच वेळी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी (दि.१३) काही कारणावरून याचिकेवर सुनावणी झाली नाही. मात्र आता १ फेबु्रवारीस सुनावणी होणार आहे. त्यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीला नोटिसा बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मखमलाबाद येथे स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प राबविण्यासाठी शेतकºयांच्या जागा घेण्यात आल्या असून याठिकाणी टीपी स्कीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रारूप मसुदा तयार करण्यात आला असून तो शेतकºयांना सादर करण्यात आली आहे. नगररचना संचालकांकडून त्याची तपासणी झाल्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहे. ५० टक्के शेतकºयांनी विरोध केल्यासच हा प्रकल्प रद्द करण्यात येणार आहे.

Web Title: Petition hearing against smart project in Makhlamabad on February 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.