पेठ तालुका तंबाखुमुक्त म्हणून जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 05:43 PM2020-02-03T17:43:58+5:302020-02-03T17:44:32+5:30

पेठ : तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांमांपासून शालेय विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी पेठ तालुक्यातील २२६ शाळा तंबाखू मूक्त जाहीर करून नाशिक जिल्हयात प्रथम तंबाखू मुक्त तालुका ठरला आहे.

Peth taluka declared as tobacco free | पेठ तालुका तंबाखुमुक्त म्हणून जाहीर

पेठ तालुका तंबाखुमुक्त म्हणून जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात प्रथम २२६ शाळा झाल्या तंबाखू पासून दूर

जागतिक कर्करोग दिन विशेष...
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांमांपासून शालेय विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी पेठ तालुक्यातील २२६ शाळा तंबाखू मूक्त जाहीर करून नाशिक जिल्हयात प्रथम तंबाखू मुक्त तालुका ठरला आहे.
जूलै महिन्यापासून गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सलाम मुंबई फाउंडेशन व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, शासकिय व खाजगी शाळांमध्ये विविध उपक्र म राबवण्यात आले.
त्यामध्ये १ ते ११ निकषांची पूर्तता करण्यासाठी शाळास्तरावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, जनजागृती फेरी, आरोग्य तपासणी शिबीर राबवून जवळपास २६ हजार ७७६ विद्यार्थी व शिक्षकांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेत.
संपूर्ण तालुका तंबाखू मुक्त जाहीर करण्यात आला आहे. अतिदुर्गम व आदिवासी असा हा तालुका असूनही पेठ तालुक्याने जिल्हयात प्रथम तंबाखू मुक्त होण्याचा मान मिळविला आहे.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यसनापासून व तंबाखूजन्य पदार्थापासून परावृत्त करण्यासाठी तसेच बालपणापासून व्यसनमुक्तीचे संस्कार घडवण्यासाठी पेठ तालुक्यात राबवलेल्या विविध उपक्र मामध्ये शिक्षक व पर्यवेक्षिय यंत्रणेने परिश्रम घेऊन पेठ तालुका तंबाखू मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले.
- सरोज जगताप, गटशिक्षणाधिकारी, पेठ.
 

Web Title: Peth taluka declared as tobacco free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.