पतीराजांचा गावपातळीच्या कारभारात धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 09:00 PM2019-08-19T21:00:59+5:302019-08-19T21:01:14+5:30

घोटी : राजकारणात महिलांना समान वाटा मिळाल्याने केवळ ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेत अडकलेल्या ग्रामीण भागातील महिलांना आरक्षण ही सुवर्णसंधी ठरली आहे. दुर्दैवाने इगतपुरी तालुक्यातील ४६ गावांचा कारभार सांभाळणाऱ्या महिला सरपंच आणि ११ महिला उपसरपंचाच्या बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये त्यांच्या पतींचा राज्यकारभार सुरू आहे, त्यामुळे महिलांच्या नेतृत्वगुणांना केराची टोपली मिळाल्याचे चित्र आहे. याला सरपंच पती अर्थात ‘एसपीं’चा गाव कारभारात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप वाढल्याचे महत्वाचे कारण आहे.

Patriarch's Dhundgus in village affairs | पतीराजांचा गावपातळीच्या कारभारात धुडगूस

पतीराजांचा गावपातळीच्या कारभारात धुडगूस

Next
ठळक मुद्देइगतपुरी तालुक्यातील सरपंचमहिला सरपंचांची होतेय घुसमट

भास्कर सोनवणे । लोकमत न्यूज नेटवर्क
घोटी : राजकारणात महिलांना समान वाटा मिळाल्याने केवळ ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेत अडकलेल्या ग्रामीण भागातील महिलांना आरक्षण ही सुवर्णसंधी ठरली आहे. दुर्दैवाने इगतपुरी तालुक्यातील ४६ गावांचा कारभार सांभाळणाऱ्या महिला सरपंच आणि ११ महिला उपसरपंचाच्या बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये त्यांच्या पतींचा राज्यकारभार सुरू आहे, त्यामुळे महिलांच्या नेतृत्वगुणांना केराची टोपली मिळाल्याचे चित्र आहे. याला सरपंच पती अर्थात ‘एसपीं’चा गाव कारभारात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप वाढल्याचे महत्वाचे कारण आहे.
जोशात असलेले सरपंच पतीराज थेट पंचायत समिती आणि तहसीलदार कार्यालयात स्वत: सरपंच असल्याच्या फुशारक्या मारीत असल्याचे दिसून आलेले आहे. यामुळे महिलांना सत्तेत ५० टक्के वाटा देण्याचा मूळ उद्धेश पुर्णपणे अयशस्वी होत आहे. सरपंच पतीराज थांबवून महिला सरपंचांना अधिकाधिक सक्षम करावे अशी मागणी होत आहे.
इगतपुरी तालुक्यात ४६ गावांमध्ये महिला सरपंच निवडून आल्या आहेत. उपसरपंचपद महिलांसाठी आरक्षित नसले तरीही १४ गावांमध्ये उपसरपंचपदी महिलांची ह्या पदावर निवड झालेली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना निम्मा वाटा देण्याचा सरकारचा उद्धेश चांगलाच साध्य झाल्याचे पहायला मिळत आहे. मात्र सरपंच पतीराजांचे वाढते वर्चस्व त्यांच्या अधिकारांवर गदा आणीत असून बºयाच सरपंच महिलांवर ‘सयाजीराव’ बनण्याची वेळ आली आहे.
बहुतांश गावातील महिला सरपंच सुशिक्षित आहेत. म्हणून या वर्षी झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक महिला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वत:हून पुढे सरसावल्या. गावाच्या विकासाचा आराखडा मतदारांच्या पुढे प्रभावीपणे मांडत आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात महिला उमेदवार निर्भीडपणे निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या.
त्यानंतर निवडणुकीत विजयी होऊन यातील काहीजणी आता थेट गावच्या गावकारभारीण बनल्या. तर बºयाच महिला ग्रामपंचायत सदस्यपदी काम करू लागल्या आहेत. तालुक्यातील ४६ महिला सरपंच आणि ११ महिला उपसरपंचांपैकी बºयाच महिला केवळ रबरी शिक्का बनवल्या गेल्या आहेत.
त्यांच्या पतीराजांचे ग्रामपंचायत कार्यालयात स्वत: सरपंच असल्याचे समजून वावरणे, सरपंच खुर्चीवर अतिक्र मण करणे, नागरिकांना स्वत: उत्तरे देणे, ग्रामसेवकांना धारेवर धरणे, तालुक्याला स्वत: जाऊन सरकारी कार्यालयात उठ-बस करणे अशी त्यांची कामे सुरू आहेत. पत्नी सरपंच असतांनाही पतीराजांचे व्हॉटस अ‍ॅप स्टेट्सवर सरपंच उल्लेख असतो. महिला सरपंचांनी गावाच्या विकासासाठी स्वत: कामकाज करावे अशी नागरिकांची भावना आहे. अनेकदा महिलांचे कामकाज त्यांचे पतीराज करताना पहायला मिळत आहे.
चौकट...
नुकत्याच शिर्र्डी येथील महाराष्ट्र शासन आयोजित सरपंच मेळाव्यात निम्मे सरपंच पती अर्थात एसपी यांनी पत्नीला डावलून हजेरी लावली. त्यामुळे ग्रामविकासामध्ये चांगले योगदान देण्याची क्षमता असूनही महिला सरपंचांची परवड वाढली आहे.
प्रतिक्रि या.....
ज्या रणरागिणी कुटुंबाला उन्नत करू शकतात त्या गावाला वेगाने पुढे नेऊ शकतात. त्यांच्या कार्यकुशलतेचा उपयोग ग्रामविकास साधण्यासाठी व्हावा. पतीराजांनी त्यांच्या सामर्थ्याला ओळखून त्यांचे नेतृत्वगुण विकसित करायला हवे.
- रमण आडोळे, महिला सरपंच टाके घोटी.
सरपंच महिलेशिवाय इतरांनी कारभारात हस्तक्षेप करणे कायद्याने गैर आहे. महिलांना ग्रामविकास साधण्यासाठीचे तंत्र अवगत आहे. पतीराजांनी त्यांना त्यांचेकडील नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व विकसित करण्यासाठी स्वातंत्र्य द्यायला हवे.
- भरत वेंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी, इगतपुरी.
महिलांना सत्तेत वाटा देण्याचा शासनाचा हेतू आहे. सरपंच महासंघाची भूमिका महिलांनी कुशलतेने कार्य करावे अशीच आहे. वेळोवेळी होणाºया समन्वयामध्ये आमच्याकडून ह्या बाबी प्रकर्षाने चर्चेत आणल्या जातात. पुरु षांनी महिला लोकप्रतिनिधींच्या पंखात बळ भरावे.
- हरिश्चंद्र चव्हाण, सरपंच, महासंघ पदाधिकारी.

Web Title: Patriarch's Dhundgus in village affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.