आनंदमेळ्यातून मांडल्या बळीराजाच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 09:35 PM2020-01-14T21:35:12+5:302020-01-15T00:11:43+5:30

पाच रु पयाला देतोस का...? परवडत नाही ओ.....मग पंधराला दोन देतोस का? नाही ओ.. खर्चही सुटत नाही... आई-वडील थंडी गारठ्यात रात्रंदिवस शेतात राबतात...पिकांना पाणी देतात....मग कुठे हा भाजीपाला बाजारात विक्रीला आणतो. त्याच्यावर होणारा खर्चही फिटणेही अवघड आहे, अशा शब्दात शेतकऱ्यांच्याच मुलांनी बळीराजाच्या व्यथा मांडल्या.

 The pain of the victim presented by the fun | आनंदमेळ्यातून मांडल्या बळीराजाच्या व्यथा

सिन्नर तालुक्यातील देवपूर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित आनंद मेळ्यात भाजीपाल्याच्या विक्रीतून व्यवसाय ज्ञानाचे धडे गिरविताना विद्यार्थी. समवेत विजय गडाख, नानासाहेब खुळे, दत्तात्रय आदिक आदी.

Next

सिन्नर : पाच रु पयाला देतोस का...? परवडत नाही ओ.....मग पंधराला दोन देतोस का? नाही ओ.. खर्चही सुटत नाही... आई-वडील थंडी गारठ्यात रात्रंदिवस शेतात राबतात...पिकांना पाणी देतात....मग कुठे हा भाजीपाला बाजारात विक्रीला आणतो. त्याच्यावर होणारा खर्चही फिटणेही अवघड आहे, अशा शब्दात शेतकऱ्यांच्याच मुलांनी बळीराजाच्या व्यथा मांडल्या. माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणात आनंदमेळ्यात या संवादात वास्तवातील असल्याने व्यवहारज्ञानाचे धडे गिरविणाºया व ग्राहक म्हणून वावरणाºया विद्यार्थी व शिक्षकांच्या डोळ्यांत यानिमित्ताने झणझणीत अंजन घातले गेले. देवपूर विद्यालयात आयोजित या आनंदमेळ्याचे उद्घाटन सिन्नर पंचायत समितीचे गटनेते तथा माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संचालक विजय गडाख यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक आर. वाय. मोगल, सुमन मुंगसे, नवनाथ शिंदे, एनडीएसटीचे संचालक दत्तात्रय आदिक आदी उपस्थित होते. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध भाजीपाला, फळे, खाण्याचे पदार्थ, खेळण्या, वस्तू यांची दुकाने मांडण्यात आली होती.
सुमारे ९०हून अधिक स्टॉल मांडले गेले होते. प्रमुख पाहुण्यांनी तसेच पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्य प्रमाणावर खरेदी केली परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे संयोजन एस. एस. सैंद्रे, वैशाली पाटील, शंकर गुरुळे, प्रमोद बधान, नानासाहेब खुळे, राजेश आहेर, सुवर्णा मोगल, मीनानाथ जाधव, गणेश मालपाणी, ताराबाई व्यवहारे, सोपान गडाख, रवी गडाख, बाबासाहेब गुरुळे, विलास पाटील, नारायण भालेराव आदींनी केले होते.

Web Title:  The pain of the victim presented by the fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.