ओझरला यात्रोत्सव काळात डीजेवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:51 AM2019-11-27T00:51:21+5:302019-11-27T00:53:50+5:30

ओझर : हल्ली सूचना करणारे अनेक परंतु अमलात आणणारे कमी असतात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये डीजे वाजविण्याला बंदी आहे त्यामुळे यात्रा काळात कोणीही मिरवणुकीसाठी डीजेचा वापर करू नये त्या ऐवजी पारंपरिक बेंजो किंवा संभळ- वाजंत्रीचा वापर करावा अन्यथा डीजेधारकांसह वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, खंडेराव महाराज यात्रा काळात कोणतेही गालबोट लागणार नाही यासाठी मानकऱ्यांसह ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले.

Oz banned DJs during the festival | ओझरला यात्रोत्सव काळात डीजेवर बंदी

ओझर शांतता समितीच्या बैठकीत बोलताना पोलीस निरीक्षक भगवान मथुरे. समवेत यतिन कदम, विठ्ठल कर्पे, प्रकाश महाले, धनंजय पगार आदींसह नागरिक.

Next
ठळक मुद्देखंडेराव महाराज यात्रा : शांतता समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
ओझर : हल्ली सूचना करणारे अनेक परंतु अमलात आणणारे कमी असतात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये डीजे वाजविण्याला बंदी आहे त्यामुळे यात्रा काळात कोणीही मिरवणुकीसाठी डीजेचा वापर करू नये त्या ऐवजी पारंपरिक बेंजो किंवा संभळ- वाजंत्रीचा वापर करावा अन्यथा डीजेधारकांसह वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, खंडेराव महाराज यात्रा काळात कोणतेही गालबोट लागणार नाही यासाठी मानकऱ्यांसह ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले.
येत्या २ डिसेंबरपासून सुरू होणाºया यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ओझर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम, महामार्ग वाहतूक नियंत्रक सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कदम, महामार्ग प्राधिकरण सुपरवायझर सागर पाटील, महाले, महावितरण अधिकारी विक्र म सोनवणे आदी उपस्थित होते.
सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कदम म्हणाल्या की, सध्या ओव्हरब्रिजचे काम चालू आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी दुकाने रोडपासून दूर ठेवावी, यात्रा काळातील महामार्गाची वाहतूक वरिष्ठांना सूचित करून डायव्हर्ट केली जाईल. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे म्हणाले की, यात्रा काळात महामार्ग अधिकाºयांनी रोड दुरुस्त करून वर्दळीच्या ठिकाणी (रोड क्रॉसिंगवर) गतिरोधक बसवावे, टिळकनगर अंडरपासखाली लाइट लावावेत, डायव्हर्शनच्या ठिकाणी सिग्नल बसवावे, प्लॅस्टिकमुक्तीसाठी यात्रा कमिटी आणि ग्रामपालिका यांनी यात्रा काळात सजग राहावे.
प्रकाश महाले यांनी पुलापासून सायखेडा फाट्यापर्यंत स्वच्छता करून बाजारपेठ आदी भागात लाइटची व्यवस्था करून रस्त्यातील खड्डे बुजवावे, रमेश मंडलिक यांनी बारागाडे वेळेत आणावे, अवांतर टवाळेखोरांवर नजर ठेवावी, फेट्यांची प्रथा बंद करावी. यतिन कदम यांनी ग्रामपालिकेकडून यात्रोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्र्वतोपरी मदत केली जाईल, याची ग्वाही दिली. बैठकीचे सूत्रसंचालन नानासाहेब मंडलिक यांनी केले. नागरिकांची पथदीपांची मागणीगाडे ओढण्याच्या वेळी बंदोबस्त कडक करून बारागाडे व अश्व यांना अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी. शब्बीर यांनी हायवेच्या टिळकनगर भुयारी मार्गाला (अंडरपास पुलाखाली) पथदीपांची व्यवस्था करून द्यावी. बाळू चौधरी यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी सूचना केली. विठ्ठल नाना कर्पे म्हणाले की, मानकºयांनी वेळेत गाडे आणावे. मानकºयांनी ज्याच्या त्याच्या कार्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: Oz banned DJs during the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.