कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत गावनिहाय बैठकांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:46 PM2020-06-30T17:46:53+5:302020-06-30T17:47:20+5:30

कळवण : खरीप २०२० या वर्षात कळवण तालुक्यातील प्रत्येक गावात कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचा तालुका कृषी कार्यालयामार्फत गाव निहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. कृषी संजीवनी सप्ताहात कृषी विभाग-जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ,आत्मा,कृषि मित्र मार्गदर्शनाखाली गावनिहाय बैठका घेऊन तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Organizing village wise meetings under Krishi Sanjeevani Saptah | कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत गावनिहाय बैठकांचे आयोजन

कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत गावनिहाय बैठकांचे आयोजन

Next
ठळक मुद्देकळवण : कृषि विभागामार्फत तयार केला आराखडा

कळवण : खरीप २०२० या वर्षात कळवण तालुक्यातील प्रत्येक गावात कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचा तालुका कृषी कार्यालयामार्फत गाव निहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. कृषी संजीवनी सप्ताहात कृषी विभाग-जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ,आत्मा,कृषि मित्र मार्गदर्शनाखाली गावनिहाय बैठका घेऊन तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पीक उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करणे, प्रधानमंत्री पिक विमा योजना, हवामान आधारित फळपिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना बाबत जनजागृती करणे व प्रसिध्दी देणे,प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना,जमीन आरोग्य पत्रिका वितरण व वाचन,परंपरागत कृषि विकास योजना,केंद्ग व राज्य शासनाच्या कृषि व कृषि संलग्न विभागाच्या शेतकर्यांसाठी असलेल्या योजनांबाबत मार्गदर्शन, मका पिकावरील लष्करी अळी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन, रु ंद सरी कडधान्य आंतरपिकाबाबत मार्गदर्शन, बहूपीक पध्दतीची प्रसार, एकात्मीक शेती पध्दती संकल्पनेबाबत, हायड्रोफोनिक्स -हिरवा चारा निर्मीती, भात लागवड, बी-बियाणे, खते,औषधे खरेदी व वापर करताना घ्यावयाची काळजी, मुलस्थानी जलसंधारण जनजागृती ,आपत्कालीन पीक नियोजन आदींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तालुका कृषी कार्यालयातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी हे गावनिहाय बैठकींना उपस्थित राहणार असून सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून या सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.

Web Title: Organizing village wise meetings under Krishi Sanjeevani Saptah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.