आज मध्यरात्रीपासून आदेश अधिकच कठोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:15 AM2021-04-09T04:15:53+5:302021-04-09T04:15:53+5:30

नाशिक: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बध अधिक कठोर केले असून, जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी गुरुवारी (दि.८) मध्यरात्रीपासून काटेकोरपणे ...

Orders stricter from midnight today | आज मध्यरात्रीपासून आदेश अधिकच कठोर

आज मध्यरात्रीपासून आदेश अधिकच कठोर

Next

नाशिक: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बध अधिक कठोर केले असून, जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी गुरुवारी (दि.८) मध्यरात्रीपासून काटेकोरपणे केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने हॉस्पिटल्स, रोगनिदान केंद्रे, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मसी, औषधनिर्माण करणाऱ्या संस्था, कंपन्या, सर्जिकल साहित्य आणि चष्मा निर्मिती करणाऱ्या आस्थापना सुरू राहतील. या आस्थापनांवर कोणत्याही वेळेचे बंधन असणार नाही.

जीवनावश्यक बाबींच्या दुकानाकडून कोविड मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास अशा आस्थापना कोविड अधिसूचना लागू असेपर्यंत बंद करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

लग्न समारंभाच्याबाबतीत स्थानिक पोलीस स्टेशनच्या पूर्वपरवानगीने मर्यादित संख्येच्या प्रमाणात फक्त खाजगी जागांमध्ये लग्न समांरभ करता येतील. त्याचप्रमाणे किमान उपस्थिती ठेवून विवाह नोंदणी कार्यालयातदेखील विवाह करता येईल. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार हॉटेल, बँक्वेट हॉल, लॉन्स, मंगल कार्यालये अशा ठिकाणी बाहेरील अभ्यागतांना येण्यास पूर्णपणे मनाई असल्याने अशा ठिकाणी लग्नसमारंभ करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

खाद्यगृह परवाना असलेले फूड जॉईंट्स, रस्त्याच्या कडेचे ढाबे तसेच यासारख्या ठिकाणी थांबून खाण्यास पूर्णत: बंदी करण्यात आली आहे. परंतु अशा खाद्यगृहांमधून पार्सल घेऊन जाण्यासाठी परवानगी असणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापना शेती क्षेत्राशी संबंधित असल्याने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी कोविडविषयक नियमांचे उल्लंघन झाल्यास कोविडविषयक अधिसूचना लागू असेपर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.

अपरिहार्य परिस्थितीमध्ये एखाद्या अभ्यागतास शासकीय कार्यालयात यायचे असल्यास संबंधित अभ्यागताचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असणे किंवा त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सोबत असणे अनिवार्य आहे. तसेच शासकीय कार्यालयांमधील अर्धन्यायिक कामकाजदेखील ऑनलाइन पद्धतीने चालविण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.

पाावसाळीपूर्व आणि पूर्वहंगामी शेती क्षेत्रातील कामे सुरू ठेवणे आवश्यक असल्यामुळे शेती निविष्ठा आणि अवजारे आणि पूरक व्यवसायाच्या आस्थापना दररोज सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू असतील

कोविड-१९ च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची असणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना कोविड कालावधीपर्यंत बंद करण्यात येतील, असे आदेश गुरूवार दि ८ च्या मध्यरात्री १२ वाजेपासून ते ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील, असे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशात म्हटले आहे.

Web Title: Orders stricter from midnight today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.