हिरावाडी रोडवर ओरबाडली सोनसाखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:11 AM2021-06-17T04:11:57+5:302021-06-17T04:11:57+5:30

दीड लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मोठ्याने ओरडून हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. भरवस्तीत भर दिवसा घडलेल्या घटनेने ...

Orbadli gold chain on Hirawadi road | हिरावाडी रोडवर ओरबाडली सोनसाखळी

हिरावाडी रोडवर ओरबाडली सोनसाखळी

googlenewsNext

दीड लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मोठ्याने ओरडून हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. भरवस्तीत भर दिवसा घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत दोघा अज्ञात चोरट्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

केसंसाठी चोरीप्रकरणी हिरावाडी रोडवरील दामोदरनगर येथे राहणाऱ्या कंचन कांतीलाल भंडारी (६२) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बुधवारी दुपारी पावणेबारा वाजेच्या दरम्यान हिरावाडी रोडवर भाजीपाला खरेदी

करण्यासाठी गेल्या होत्या. तेथून त्या पायी घराकडे येत असताना कॉलनी रस्त्याने आलेल्या दुचाकीवरील भामट्यांनी

त्यांच्या गळ्यातील पावणेचार तोळे वजनाची दीड लाख रुपयांची सोनसाखळी ओरबाडून पलायन केले. त्यावेळी शेजारच्या एका इसमाने या चोरांचा हिरावाडी पाटापर्यंत पाठलाग केला; मात्र गल्लीबोळातील रस्त्याने चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Orbadli gold chain on Hirawadi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.