विधीशाखेच्या पेपरफुटी प्रकरणी फेरपरीक्षा घेण्यास विद्यार्थ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 07:56 PM2019-02-22T19:56:37+5:302019-02-22T20:02:54+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी शाखेच्या २०१७ च्या पॅटर्ननुसार एलएलबी पदवीच्या प्रथम वर्षाचे पेपर फुटल्यानंतर संबंधित विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. परंतु, नाशिकमधील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या निर्णयाला विरोध केला असून, या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाकडून चूक झाली आहे. त्यामुळे याची शिक्षा विद्यार्थ्यांना का दिली जात आहे? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित करीत विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांना निवेदन दिले आहे. 

Opposition students questioned for paperfuture in the Vidhishaksh | विधीशाखेच्या पेपरफुटी प्रकरणी फेरपरीक्षा घेण्यास विद्यार्थ्यांचा विरोध

विधीशाखेच्या पेपरफुटी प्रकरणी फेरपरीक्षा घेण्यास विद्यार्थ्यांचा विरोध

Next
ठळक मुद्देविधी शाखेचे पेपर फुटल्याचे प्रकरण वेबसाईटवर पेपर अपलो़ड करण्याचा प्रकार विद्यार्थ्यांचा फेर परीक्षा घेण्यास विरोध

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी शाखेच्या २०१७ च्या पॅटर्ननुसार एलएलबी पदवीच्या प्रथम वर्षाचे पेपर फुटल्यानंतर संबंधित विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. परंतु, नाशिकमधील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या निर्णयाला विरोध केला असून, या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाकडून चूक झाली आहे. त्यामुळे याची शिक्षा विद्यार्थ्यांना का दिली जात आहे? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित करीत विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांना निवेदन दिले आहे. 
विद्यापीठाकडून एलएलबी प्रथम वर्षाच्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या अनुक्रमे गुन्हेगारी कायदा (लॉ ऑफ क्रामस्)व त्याचा पर्यायी विषय मालमत्ता कायदा (इंटेल्युक्युअल प्रॉपर्टी राइट्स) या विषयांचे पेपर फुटल्याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दि. २० फेब्रुवारीला प्रकाशित करण्यात आली असून, त्याद्वारे पुनर्परीक्षेचे अयोजने करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाकडून चूक झाली आहे. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना देऊ नये, या प्रकरणास जबाबदार असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नाशिकमधील विविध विद्यार्थी संघटनांनी केली आहे. यावेळी विद्यार्थी नेते अजिंक्य गिते, तुषार जाधव, वैभव वाक्चौरे, प्राजक्ता जोशी, अभिजित गवते, राधिका रत्नपारखी, महेश गायकवाड, कुणाल डोळस स्वेताली अहिले, सानिका कुलकर्णी, मयुरी जाधव आदी विद्यार्थी उपस्थित होते. 

Web Title: Opposition students questioned for paperfuture in the Vidhishaksh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.