एचएएल कामगार संघटनेच्या ऑनलाइन निवडणुकीस विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 08:15 PM2021-11-28T20:15:16+5:302021-11-28T20:15:16+5:30

ओझरटाऊनशिप : येथील एच.ए.एल. कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक ऑनलाइन घेण्याच्या व्यवस्थापनाने कामगार संघटनेसमोर ठेवलेल्या पर्यायास श्रीविश्वास ग्रुपचा विरोध असून, ऑनलाइन निवडणूक प्रक्रियेत खूप साऱ्या त्रुटी असल्याने कामगार संघटनेची निवडणूक सिक्रेट बॅलेट पेपरद्वारेच घेण्यात यावी, अशी मागणी कामगार संघटनेचे विरोधी गटाचे सहचिटणीस व श्रीविश्वास ग्रुपचे प्रमुुख गिरीश वलवे यांनी संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Opposition to the online election of the HAL trade union | एचएएल कामगार संघटनेच्या ऑनलाइन निवडणुकीस विरोध

एचएएल कामगार संघटनेच्या ऑनलाइन निवडणुकीस विरोध

googlenewsNext
ठळक मुद्देप्रणालीत त्रुटी : विरोधी गटाने घेतला आक्षेप, संघटनेला दिले निवेदन

ओझरटाऊनशिप : येथील एच.ए.एल. कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक ऑनलाइन घेण्याच्या व्यवस्थापनाने कामगार संघटनेसमोर ठेवलेल्या पर्यायास श्रीविश्वास ग्रुपचा विरोध असून, ऑनलाइन निवडणूक प्रक्रियेत खूप साऱ्या त्रुटी असल्याने कामगार संघटनेची निवडणूक सिक्रेट बॅलेट पेपरद्वारेच घेण्यात यावी, अशी मागणी कामगार संघटनेचे विरोधी गटाचे सहचिटणीस व श्रीविश्वास ग्रुपचे प्रमुुख गिरीश वलवे यांनी संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कामगार संघटनेची प्रलंबित निवडणूक तातडीने घेण्यास आजी माजी पदाधिकाऱ्यांनी संमती दिलेली आहे; पण कामगार संघटनेच्या नियमावलीनुसार निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने होणे अपेक्षित आहे. तशी संघटनेची नियमावली आहे. तरीसुद्धा व्यवस्थापनाने ऑनलाइन निवडणुकीचा पर्याय कामगार संघटनेसमोर ठेवत संघटनेचे आजी माजी पदाधिकारी व सर्व गटाचे कार्यकर्ते यांना ऑनलाइन निवडणूक डेमो दाखविला; परंतु ऑनलाइन निवडणूकप्रणालीत बऱ्याच त्रुटी आहेत. या सगळ्या त्रुटींची पूर्तता झाल्याशिवाय निवडणूक होऊ शकणार नाही, कॉम्प्युटर स्क्रीन ही प्रत्येक पदासाठी आणि निशाणी चिन्हांसहित अंकित नाही, कॉम्प्युटर स्क्रीन ही कुठल्याही पासवर्डविरहित नसल्याने कामगारांच्या मतदानाविषयी गुप्तता पाळता येत नाही, मतदान केल्यानंतर त्यांची प्रिंट निघून मतपेटीत टाकण्याची सुविधा त्यात नाही, फेरमतमोजणी करायची सुविधा नाही, यासह बऱ्याच त्रुटी या प्रक्रियेत आहेत.

१५ दिवसांपूर्वीच एचएएल हैदराबाद डिव्हिजनच्या कामगार संघटनेची निवडणूक आणि नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसची निवडणूक सिक्रेट बॅलेट पद्धतीने घेण्यात आली आहे. त्यामुळे मतपत्रिकेद्वारेच कामगार संघटनेची निवडणूक व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेतील विरोधी गटाचे सहचिटणीस गिरीश वलवे, पवन आहेर, योगेश आहिरे, सचिन धोंडगे, कैलास सातभाई, मनोहर खालकर या पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत

कामगार संघटनेची निवडणूक घेण्यासंदर्भात सर्व स्तरावर परवानगी मिळाली आहे. आता लवकरात लवकर निवडणूक घेणे अपेक्षित आहे. सत्ताधारी गटाला पाच महिन्यांचा बोनस कालावधी मिळाला असून, आता संघटनेने बाय बॅलेट निवडणूक घेण्यास व्यवस्थापनाला भाग पाडावे. ऑनलाइनच मध्येच व्यवस्थापनाने दिलेल्या डेमोमध्ये खूप त्रुटी असल्यामुळे ऑनलाइन निवडणुकीस आमचा विरोध आहे.
- गिरीश वलवे, सहचिटणीस, एचएएल कामगार संघटना

Web Title: Opposition to the online election of the HAL trade union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.