दुर्घटनेवर विरोधकांनी स्टंटबाजी करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:17 AM2021-04-23T04:17:07+5:302021-04-23T04:17:07+5:30

शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समिती अहवालामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, त्यामुळे आरोप करण्याची ...

Opponents should not stunt on the accident | दुर्घटनेवर विरोधकांनी स्टंटबाजी करू नये

दुर्घटनेवर विरोधकांनी स्टंटबाजी करू नये

Next

शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समिती अहवालामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, त्यामुळे आरोप करण्याची घाई करू नये, असा महापौरांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. वास्तविक पाहता कोरोना संसर्गाचा प्रभाव हा मागील वर्षापासून सुरू असून, मागील वर्षभरात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांकडे कोणत्याही विरोधी पक्षाने राजीनाम्याची मागणी केलेली नाही हे राज्यामध्ये सत्तेत असलेल्या; परंतु नाशिक महानगरपालिकेत विरोधात असलेल्या राजकीय पक्षांनी लक्षात घ्यावे, असेही नमूद करण्यात आले आहे. वास्तविक हे वैश्विक संकट असून, त्याचा सर्वपक्षीयांनी एकत्रित एकदिलाने या संकटाचा सामना केला पाहिजे, असेही नमूद केले.

इन्फो..

सद्य:स्थितीत नाशिक महागनरपालिकेच्या दोन रुग्णालयात ३७ व्हेंटिलेटर बेड, ५५० ऑक्सिजन बेड याचबरोबर मनपाच्या सर्व कोविड केअर सेंटरमध्ये एकूण दोन हजार २४९ जनरल बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी रेमडेसिविर आणि इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा होत आहे. परंतु शहरातील इतर खासगी कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन,व्हेटिलेटर व रेमडेसिविर औषधांची उपलब्धता होत नाही ही बाब महानगरपालिकेच्या अखत्यारीतील नसून त्याची संपूर्णत: जबाबदारी जिल्हा प्रशासन व त्यावर नियंत्रण ठेवणारे महाराष्ट्र राज्य शासनाची आहे व वैयक्तिक त्या रुगणालयाची असते, असेही महापौरांनी नमूद केले आहे.

Web Title: Opponents should not stunt on the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.