येवलायेथेआॅनलाईन मुक्ती महोत्सव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 07:17 PM2020-10-12T19:17:27+5:302020-10-13T01:41:51+5:30

येवला : कोरोना प्रार्दुभावाने सर्व मंदिर, धार्मिक स्थळे टाळे बंद झालेली आहेत. तर सण उत्सवांवरही बंधने आली आहेत. येथील मुक्तीभूमीवरील यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराची घोषणा ८५ वा वर्धापनदिन कार्यक्र मही यंदा रद्द करण्यात आला आहे.

Online Liberation Festival begins in Yeola | येवलायेथेआॅनलाईन मुक्ती महोत्सव सुरू

येवलायेथेआॅनलाईन मुक्ती महोत्सव सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आजदिलीजाणारमानवंदना

योगेंद्र वाघ
येवला : कोरोना प्रार्दुभावाने सर्व मंदिर, धार्मिक स्थळे टाळे बंद झालेली आहेत. तर सण उत्सवांवरही बंधने आली आहेत. येथील मुक्तीभूमीवरील यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराची घोषणा ८५ वा वर्धापनदिन कार्यक्र मही यंदा रद्द करण्यात आला आहे. मात्र, आॅनलाईन मुक्ती महोत्सव सुरू असून मंगळवारी(दि.१३) शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मानवंदना दिली जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. १३ आॅक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाला मुक्तिभूमी म्हणून संबोधण्यात येते. दरवर्षी या दिवशी देशभरातून लाखो बौद्धबांधव मुक्तीभूमीवर वंदन करण्यासाठी येत असतात. या स्थळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श लाभल्यामुळे हे स्थान बौध्दबांधवांसाठी अतिमहत्वाचे तीर्थस्थळ बनलेले आहे.
येवला मुक्तिभूमीचा विकास होत आहे. याठिकाणी विश्वभूषण स्तूप, भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेबांचे भव्य स्मारक निर्माण करण्यात आले आहे. पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे (बार्टीकडे) या स्मारकाची देखभाल व दुरु स्तीचे काम दिलेले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी सदर स्मारक परिसरात प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, वाचनालय, कर्मचारी निवासस्थान, संरक्षण भिंत, अ‍ॅम्पीथिएटर, लॅण्डस्केपिंग, अतिथीगृह इ. बांधकामांना प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे अंदाजपत्रके व आराखड्यावर सविस्तर प्रस्ताव सादर केलेला होता. सदर प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी प्रलंबित होता. राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी या कामांना प्रशासकीय मंजुरी तसेच १५ कोटी रु पये निधी मंजूर केला आहे. मात्र अद्याप सदर कामे सुरू झोलेली नाहीत.
इनफो ...
१)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुक्तीभूमीवरील १३ आॅक्टोबर निमित्त होणारे सर्व कार्यक्र म रद्द केले आहेत. मात्र मुक्तीभूभीवर विद्युत रोषणाई अन् सजावट केली असून शासकीय अधिकारी, कर्मचाºयांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण व मानवंदना दिली जाणार आहे. दरम्यान, मुक्तीभूमी परिसरात इतरांना प्रवेशास बंदीच असणार आहे.
२) ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा ८५व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारपासून आॅनलाईन मुक्ती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात तीन दिवस व्याख्यानांचे आयोजन केले होते. मंगळवारी (दि.१३) दुपारी २ वा. आंबेडकरवादी गझल संमेलनाने महोत्सवाचा समारोप होणार आहे.
 

Web Title: Online Liberation Festival begins in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.