डोंगरमाथ्यावरील नेटवर्कवर आॅनलाइन होमवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 09:29 PM2020-06-23T21:29:57+5:302020-06-23T21:30:46+5:30

वाडीवºहे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने आॅनलाइन शिक्षणाचा प्रयोग सुरू केला असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग खूपच अडचणीचा ठरू पाहत आहे.

Online homework on the Mountain Network | डोंगरमाथ्यावरील नेटवर्कवर आॅनलाइन होमवर्क

डोंगरमाथ्यावरील नेटवर्कवर आॅनलाइन होमवर्क

Next
ठळक मुद्देमोडाळेच्या विद्यार्थ्यांची कसरत : शाळेकडूनही प्रशासनाला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
वाडीवºहे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने आॅनलाइन शिक्षणाचा प्रयोग सुरू केला असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग खूपच अडचणीचा ठरू पाहत आहे.
ग्रामीण दुर्गम भागात अनेकांकडे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल नाही आणि ज्याच्याकडे आहे त्यांना नेटवर्कसाठी झुंजावे लागत आहे. मोडाळे गावात तर नेटवर्कसाठी मुलांना एक किलोमीटर पायी जात डोंगरमाथा गाठावा लागत असून, त्यातून आॅनलाइन शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. दरम्यान, गावात नेटवर्क उपलब्ध होत नसल्याचा अहवाल शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाला पाठविला आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गाव सगळीकडे डोंगर रांगानी वेढलेले आहे. त्यामुळे या गावात कोणत्याच मोबाइल कंपनीला नेटवर्क मिळत नाही. शासनाने मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुलांना आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय सुरू केला आहे, परंतु तो ग्रामीण भागात अडचणीचा ठरत आहे.
कोरोनाच्या धर्तीवर हा पर्याय जरी योग्य असला तरी ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे मोबाइल असूनही नसल्यासारखाच आहे. मोडाळे गावातदेखील अशीच परिस्थिती असल्याने विद्यार्थ्यांना चक्क धडे गिरविण्यासाठी मोबाइल घेऊन एक किमी पायी चालत डोंगरावर जावे लागते. याठिकाणी मोबाइलची रेंज मिळत असल्याने विद्यार्थ्यांना डोंगरावर जाताना विषारी प्राण्यांच्या भीतीने आपला जीव मुठीत धरून ही कसरत करावी लागत आहे. बऱ्याचदा नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आमच्या गावात कुठल्याही मोबाइलला नेटवर्क कव्हरेज मिळत नाही. परिणामी फोन करायचा असल्यास गावाशेजारील डोंगरावर जावे लागते. ग्रामपंचायतीच्या वतीने मागणीदेखील केली असताना कुठलीच नेटवर्क कंपनी दखल घेत नाही.
- मंगला बोंबले, सरपंचमोडाळे गावात कोणत्याच मोबाइल कंपनीचे
नेटवर्क मिळत नाही तसेच गावातील प्रत्येक पालकाची अ‍ॅण्ड्राइड मोबाइल घेण्याची ऐपत नाही. गावात नेटवर्कच मिळत नाही तर आॅनलाइन अभ्यास कसा करणार?
- हरिदास सूर्यवंशी, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समितीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाइन शिक्षण देता येत असले तरी मोडाळ्यात कुठल्याच कंपनीला नेटवर्कमिळत नसून तसा अहवालदेखील आम्ही शासनाकडे पाठविला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी आपला जीव धोक्यात घालून डोंगरावर जाऊ नये.
- चंद्रभागा तुपे, मुख्यध्यापक, जिल्हा परिषद शाळा, मोडाळे

Web Title: Online homework on the Mountain Network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.