आरोग्य विद्यापीठाकडून आॅनलाइन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 11:38 PM2020-04-09T23:38:27+5:302020-04-09T23:38:46+5:30

कोरोनामुळे अनेक शिक्षणसंस्था बंद असल्यातरी या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काय व्यवस्था करण्यात आली आह, याचा आढावा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेतला. यावेळी आरोग्य विद्यापीठाकडून आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आॅनलाइन शिक्षणप्रणालीचा वापर करण्यात येत असल्याची माहिती कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली.

Online education from the University of Health | आरोग्य विद्यापीठाकडून आॅनलाइन शिक्षण

आरोग्य विद्यापीठाकडून आॅनलाइन शिक्षण

Next
ठळक मुद्देराज्यपालांकडून आढावा : यूट्यूब चॅनेलद्वारे ३० हजार विद्यार्थ्यांकडून लाभ

नाशिक : कोरोनामुळे अनेक शिक्षणसंस्था बंद असल्यातरी या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काय व्यवस्था करण्यात आली आह, याचा आढावा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेतला. यावेळी आरोग्य विद्यापीठाकडून आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आॅनलाइन शिक्षणप्रणालीचा वापर करण्यात येत असल्याची माहिती कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली.
राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंची आॅनलाइन बैठक राज्यपालांनी घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विद्यापीठांच्या कार्यप्रणालीची माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाबाबत काय नियोजन करण्यात आले याविषयी आढावा घेतला. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाच्या नियोजनाची माहिती दिली. लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आरोग्य विद्यापीठाकडून विविध उपायोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आॅनलाइन अभ्यासक्रमाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इन्फोर्मेशन, कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजीचा प्रभावी वापर करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने आदेशित केलेले आहे.
विद्यापीठाने झूम या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ‘लाइव्ह लेक्चरर्सचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. याचा लाभ शिक्षकांनादेखील होणार आहे. विद्यार्थी इंटरनेटद्वारा संगणक, मोबाइल व टॅब्लेटवर लाइव्हल लेक्चर व संवाद साधता येणार आहे. विद्यापीठाने आॅनलाइन शिक्षणाकरिता ‘एमयूएचएस लर्निंग’ नावाने यू-ट्यूब चॅनल सुरू केले असून, आजवर तीस हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे.

Web Title: Online education from the University of Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.