कांदा दरात ४५० रूपयांची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 01:33 PM2019-10-14T13:33:04+5:302019-10-14T13:33:13+5:30

लासलगाव : येथील बाजार समितीसह जिल्ह्यात बाजारपेठेतील कांदा आवक कमी झाली असून सोमवारी सकाळी दरात ४५० रूपयांची घसरण झाली.

Onion prices fall by Rs | कांदा दरात ४५० रूपयांची घसरण

कांदा दरात ४५० रूपयांची घसरण

Next

लासलगाव : येथील बाजार समितीसह जिल्ह्यात बाजारपेठेतील कांदा आवक कमी झाली असून सोमवारी सकाळी दरात ४५० रूपयांची घसरण झाली. सकाळी २३० वाहनांची आवक असून किमान १२०० ते कमाल ३०१३ व सरासरी २६०० रूपये भाव होता. दररोज भावात एकाच वर्षात चारशे रूपयांची घसरण होत शुक्र वारी ३९०० रूपये क्विंटल कांदा किमान १२०० ते कमाल ३४५२ व सरासरी ३००० रूपये भावाने विक्र ी झाला. त्यामुळे सोमवारी भाव कमी होण्याची शक्यता आहे. दिनांक १२ व १३ रोजी साप्ताहिक सुट्टी (शनिवार व रविवार) असल्याने कांदा व धान्य लिलाव बंद होते. आता दिवाळीला खर्चाची गरज म्हणुन येत्या आठवड्यात आवक वाढेल असे दिसते. त्यात कमी भाव जाहीर झाले तर आता दिवाळी कशी जाणार? कांदा उत्पादकांना याची चिंता भेडसावित आहे.आता दिवाळीनंततरच कांदा निर्यात बंदी उठवण्याचा फेरविचार सरकार करणार असल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे कांदा भावाची पातळी वाढली जाण्याची शक्यता दुरावली आहे.त्यामुळे सरकारी निर्णयाने आता कमी भावाने कांदा उत्पादकांच्या घरात दिवाळीला आनंदाला ओहोटी येईल असे दिसत आहे. लासलगांव बाजार समितीत गत सप्ताहात गुरूवारी बुधवारच्या तुलनेत कमाल भावात ७५ तर सरासरी भावात १५१ रूपयांची घसरण झाली. कांदा आवक केवळ ४१० वाहनांची सकाळी झाली असुन क बाजारभाव रूपये प्रति क्विंटल किमान १२०१ ते कमाल ३८२५ रूपये सरासरी ३४०० रूपये होते. तर बुधवारी ३३१ वाहनांतुन ३८५३ क्विंटल कांदा लिलाव किमान १४०१ ते कमाल ३८०६ व सरासरी ३५५१ रूपये होते.

Web Title: Onion prices fall by Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक