कांदा आवक वाढली, भावात मात्र घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 07:23 PM2020-07-04T19:23:24+5:302020-07-04T19:25:11+5:30

येवला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारासह अंदरसूल उपबाजार आवारावर सप्ताहात मोठ्या प्रमाणात कांदा आवक वाढली असून बाजारभावात मात्र घसरण झाल्याचे दिसून आले.

Onion inflows increased, but prices declined | कांदा आवक वाढली, भावात मात्र घसरण

कांदा आवक वाढली, भावात मात्र घसरण

Next
ठळक मुद्देबाजारभाव सरासरी ६५० रूपये प्रति क्विंटल राहिले.

येवला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारासह अंदरसूल उपबाजार आवारावर सप्ताहात मोठ्या प्रमाणात कांदा आवक वाढली असून बाजारभावात मात्र घसरण झाल्याचे दिसून आले.
सप्ताहात येवला बाजार समितीच्या मुख्य आवारात ७७ हजार ९४६ क्विंटल तर अंदरसूल उपबाजार आवारावर ८ हजार क्विंटल कादा आवक झाली. बाजारभाव सरासरी ६५० रूपये प्रति क्विंटल राहिले.
शनिवारी (दि.०४) येवला बाजार आवारावर १९ हजार २८१ क्विंटल कांदा आवक झाली. बाजारभाव किमान ३०० ते कमाल ८२१ रूपये तर सरासरी ६५० रूपये होते. अंदरसूल उपबाजार आवारावर १५ हजार ४०४ क्विंटल कांदा आवक झाली. बाजारभाव किमान २०० ते कमाल ८१७ रूपये तर सरासरी ७०० रूपये होते.

Web Title: Onion inflows increased, but prices declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.