कर्जफेड न करणाऱ्या कर्जदारास एक वर्ष तुरुंगवास १० लाख दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:56 PM2019-09-23T22:56:41+5:302019-09-23T22:56:56+5:30

कळवण : येथील श्री आनंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कर्जाची परतफेड करणाºया कर्जदारास एक वर्ष तुरुंगवास व १० लाख रुपये दंडाची शिक्षा नाशिकचे जिल्हा सत्र न्यायधीशांनी सुनावली आहे. या निर्णयामुळे वेळेत पतसंस्थेचे कर्जफेड न करणाºया कर्जदाराचे धाबे दणाणले आहे.

One-year imprisonment for non-repaying borrower fined Rs | कर्जफेड न करणाऱ्या कर्जदारास एक वर्ष तुरुंगवास १० लाख दंड

कर्जफेड न करणाऱ्या कर्जदारास एक वर्ष तुरुंगवास १० लाख दंड

Next
ठळक मुद्देकर्जाच्या रकमे पोटी ९ लाख ९३ हजाराचा धनादेश दिला होता.

कळवण : येथील श्री आनंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कर्जाची परतफेड करणाºया कर्जदारास एक वर्ष तुरुंगवास व १० लाख रुपये दंडाची शिक्षा नाशिकचे जिल्हा सत्र न्यायधीशांनी सुनावली आहे. या निर्णयामुळे वेळेत पतसंस्थेचे कर्जफेड न करणाºया कर्जदाराचे धाबे दणाणले आहे.
श्री आनंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे सभासद कर्जदार चंद्रकांत विश्वनाथ अमृतकार यांनी १० लाखाचे कर्ज झाले होते. त्यांनी कर्जाच्या रकमे पोटी ९ लाख ९३ हजाराचा धनादेश दिला होता.
संबंधित संस्थेने कर्जवसुलीसाठी सदर धनादेश बँकेत टाकला असता. कर्जदार चंद्रकांत अमृतकार यांच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने सदर धनादेश न वटता परत आला. त्यामुळे श्री आनंद पतसंस्थेने कर्जदाराविरोधात कळवण न्यायालयात कलम १३८ अन्वेय गुन्हा दाखल केला होता.
सदर केसचे कामकाज कळवण न्यायालयात गुणदोषावर चालून न्यायालयाने आरोपीस एक वर्ष तुरुंगवास १० लाख दंड व दंड न भरल्यास पाच महिने सध्या तुरुंगाची शिक्षा सत्र न्यायाधीश नाशिक यांनी सुनावली आहे. आरोपी अमृतकार याने सदर निकालाविरोधात जिल्हा सत्र न्यायाधीश नाशिक यांचेकडे अपील दाखल केले होते.
सदर अपिलाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांच्या न्यायालयात अपिलाच्या सुनावणी होऊन त्यांनी आरोपीचे अपील फेटाळत कळवण न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. संस्थेच्या बाजूने अ‍ॅड. गोरक्षनाथ नवले यांनी कामकाज पहिले.

Web Title: One-year imprisonment for non-repaying borrower fined Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.