अज्ञात वाहनाच्या धडकेने एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 01:26 AM2021-09-16T01:26:16+5:302021-09-16T01:27:05+5:30

मुंबई- आग्रा रोडवर चांदवड तालुक्यातील वडाळीभोई उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एक जण गंभीर जखमी झाला.

One seriously injured in an unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेने एक गंभीर जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेने एक गंभीर जखमी

Next

चांदवड : मुंबई- आग्रा रोडवर चांदवड तालुक्यातील वडाळीभोई उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एक जण गंभीर जखमी झाला. नाशिक ते सोग्रस जाणाऱ्या अज्ञात वाहनावरील चालकाने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने अविचाराने भरधाव वेगाने वाहन चालवून समोरून येणारी दुचाकी सीटी १०० नंबर एमएच-१८/ बीपी- ०४८८ हीस कट मारल्याने दुचाकी उड्डाणपुलाच्या कडेला असलेल्या साइटच्या कठड्यावर आदळून रोडवर पडल्याने त्यावरील दुचाकीस्वार सागर हिरामण हिरे (२३), रा. देऊर, जि. धुळे यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. वाहनचालक अपघाताची माहिती न देताच पळून गेला. याबाबत वडनेरभैरव पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जे.टी. मोरे करीत आहेत.

Web Title: One seriously injured in an unidentified vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.