एक लाख रुपये किमतीच्या कांद्याची चोेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 02:01 AM2019-09-24T02:01:12+5:302019-09-24T02:01:41+5:30

येथील रहिवासी राहुल बाजीराव पगार यांचे मोकभणगी शिवारातील शेतातून आजच्या कांद्याच्या बाजारभावाप्रमाणे १ लाख १ हजार ७९० रुपये किमतीचा साठवलेला कांदा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.

 One lakh rupees worth of onions | एक लाख रुपये किमतीच्या कांद्याची चोेरी

एक लाख रुपये किमतीच्या कांद्याची चोेरी

Next

कळवण : येथील रहिवासी राहुल बाजीराव पगार यांचे मोकभणगी शिवारातील शेतातून आजच्या कांद्याच्या बाजारभावाप्रमाणे १ लाख १ हजार ७९० रुपये किमतीचा साठवलेला कांदा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.
याबाबत शेतकरी राहुल पगार  यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी कांद्याचे संरक्षण करण्यासाठी आपला मोर्चा शेतातील कांदा चाळीकडे वळवला आहे.
पावसाळ्याच्या सुरवातीस दीड महिना पावसाने दडी मारल्याने व कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन पूर स्थितीमुळे पावसाळी लाल कांद्याचे पीक काही ठिकाणी वाया गेले, तर काही ठिकाणी उशिराने आलेल्या पावसामुळे लांबणीवर गेले आहे. त्यामुळे साठवलेल्या उन्हाळी (गावठी) कांद्याचे भाव वाढले आहेत.
एक ट्रॉली कांद्याची एक लाखापेक्षा जास्त रकमेची पावती होत असल्याने कळवण तालुक्यातील कांदा चाळीकडे चोरट्यांची वक्रदृष्टी पडली आहे. कळवण येथील शेतकरी राहुल पगार यांचे मोकभणगी शिवारात गट नं ४०३ शेती आहे. या शेतातील चाळीत २२ किलो वजनाचे ११७ प्लॅस्टिक के्रटमध्ये २५ क्विंटल ७४ किलो कांदे होते.
याबाबत काहीच तपास न
लागल्याने रविवारी (दि. २२) सायंकाळी उशिराने अज्ञात चोरट्यांविरोधात कळवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. एन. घोडे अधिक तपास करीत आहेत.
बाजार समित्यांमध्ये घेतला शोध
सध्याच्या दरानुसार म्हणजे ३५०० रु पये याप्रमाणे १ लाख १ हजार ७९० किमतीचा कांदा चोरीला गेला आहे. राहुल पगार व त्यांच्या भावाने कळवण, देवळा, उमराणे, चांदवड, लासलगाव, निफाड, पिंपळगाव, वणी, अभोणा, कनाशी, बिल्लीमोरा सुरत (गुजरात) अशा सर्व बाजार समितीत शोध घेतला आहे.

Web Title:  One lakh rupees worth of onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.