कारच्या धडकेने एक ठार; दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 12:57 AM2020-11-30T00:57:08+5:302020-11-30T00:57:35+5:30

अंगणगाव येथे विंचूर रोडवर कारच्या धडकेत पारेगाव येथील युवक ठार झाला असून दोघे जखमी झाले आहेत.

One killed in car crash; Both injured | कारच्या धडकेने एक ठार; दोघे जखमी

कारच्या धडकेने एक ठार; दोघे जखमी

Next

येवला : अंगणगाव येथे विंचूर रोडवर कारच्या धडकेत पारेगाव येथील युवक ठार झाला असून दोघे जखमी झाले आहेत.

पारेगाव येथील तिघे मित्र कैफ अकबर सय्यद (वय 16), अभिषेक बबन जाधव, सागर छबू माळी हे विंचूर रोडवर अंगणगाव येथील जनता विद्यालया समोर मोटरसायकलवर उभे होते. या दरम्यान, नाशिक कडून येणार्‍या स्कोडा कार (एमएच ०१ बीएफ ७५१५) ने जोरदार धडक दिली. या अपघातात कैफ सय्यद याच्या डोक्याला गंभीर मार लागून मृत झाला. तर दोघे जखमी झाले.

 

जखमींवर खासगी रुग्णलयात उपचार सुरू आहे. सदर घटना शनिवारी, सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: One killed in car crash; Both injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.