पेठ येथे वसुंधरा बचाव शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 06:36 PM2021-01-19T18:36:14+5:302021-01-19T18:38:59+5:30

पेठ : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान तसेच भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत पेठ नगरपंचायतीतर्फे जनता विद्यालय येथे विद्यार्थ्यांना आपली निसर्गाच्या प्रति असलेली जबाबदारी सांगण्यात येऊन निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची शपथ घेण्यात येऊन शहरास ह्यस्वच्छ पेठ, हरित पेठह्ण यासाठीचा संकल्प सोडण्यात आला.

Oath rescue vows at Peth | पेठ येथे वसुंधरा बचाव शपथ

पेठ येथील जनता विद्यालयात वसुंधरा बचाव शपथ घेतांना हेमलता बिडकर, लक्ष्मीकांत कहार, चंद्रकांत भोये, कल्पना शिरोरे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देशहरास स्वच्छ पेठ, हरित पेठ यासाठीचा संकल्प

पेठ : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान तसेच भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत पेठ नगरपंचायतीतर्फे जनता विद्यालय येथे विद्यार्थ्यांना आपली निसर्गाच्या प्रति असलेली जबाबदारी सांगण्यात येऊन निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची शपथ घेण्यात येऊन शहरास स्वच्छ पेठ, हरित पेठ यासाठीचा संकल्प सोडण्यात आला.
याप्रसंगी डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बिडकर, मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार, प्रशासन अधिकारी चंद्रकांत मोंढे, प्राचार्य कल्पना शिरोरे, राहुल वालवणे, राहुल आहिरे, भारत चव्हाण आदींसह पेठ नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी तसेच जनता विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
 

Web Title: Oath rescue vows at Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.