वरखेडा येथे बाहेरगावांहून आलेल्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:06 PM2020-04-02T17:06:04+5:302020-04-02T17:06:55+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील ग्रामपंचायत व आरोग्य विभाग सतर्कझाले असून, परदेशातून, परराज्यातून व मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून आलेल्या नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन वरखेडा ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने नोटिसा देऊन करण्यात आले आहे.

Notices to people from outskirts at Varkheda | वरखेडा येथे बाहेरगावांहून आलेल्यांना नोटिसा

वरखेडा येथे आरोग्य विभागाच्या वतीने बाहेरगावाहून आलेल्या गावकऱ्यांना नोटीस देताना ए. आर. वाघ, जयश्री कडाळे, कैलास बलसाने आदी.

googlenewsNext

वरखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील ग्रामपंचायत व आरोग्य विभाग सतर्कझाले असून, परदेशातून, परराज्यातून व मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून आलेल्या नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन वरखेडा ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने नोटिसा देऊन करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा संपूर्ण जगात प्रादुर्भाव सुरू असून, देशात, राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण भागातील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. वरखेडा येथील प्राथमिक प्राथमिक आरोग्य, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्त्या यांनी पुणे, मुंबई येथून आलेल्यांना घरीच राहण्याचा सल्ला नोटिसीद्वारे दिला आहे. यावेळी आरोग्य सेविका ए. आर. वाघ. सरपंच जयश्री कडाळे. पोलीसपाटील कैलास बलसाने, ग्रामविकास अधिकारी व्ही. पी. साबळे, भाऊराव उफाडे, सुनील शिंदे, कविता लिलके, सविता भागवत, नंदा भगरे आदी उपस्थित होते.

Web Title: Notices to people from outskirts at Varkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.