सावधान! हेल्मेट नाही तर लायसन्स रद्द अन् आजपासून ५००चा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 02:47 PM2022-01-18T14:47:18+5:302022-01-18T14:49:15+5:30

नाशिककरांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्याचा पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. बहुतांश नाशिककरांकडून हेल्मेटचा नियमित वापरदेखील केला जात आहे. ...

No helmets, license revoked and a fine of Rs 500 from today | सावधान! हेल्मेट नाही तर लायसन्स रद्द अन् आजपासून ५००चा दंड

सावधान! हेल्मेट नाही तर लायसन्स रद्द अन् आजपासून ५००चा दंड

Next

नाशिककरांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्याचा पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. बहुतांश नाशिककरांकडून हेल्मेटचा नियमित वापरदेखील केला जात आहे. मात्र काही बेशिस्तांकडून अद्यापही हेल्मेटसक्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना वठणीवर आणण्याकरिता पोलीस आुयक्त दीपक पाण्डेय यांनी आता दंडात्मक कारवाईचा आदेश दिले आहे. बेशिस्त दुचाकीचालकांना २२ डिसेंबर रोजीच अल्टिमेटम दिला होता. हे अल्टिमेटम आता संपले आहे. मंगळवारपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

पहिल्यांदा ५०० तर दुसऱ्यांदा लायसन्स रद्द

वाहतूक शाखेकडून नव्या सुधारित आदेशाप्रमाणे पोलिसांकडून विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या बेशिस्त दुचाकीचालकांना ५००रुपयांचा दंड केला जाणार आहे. एकदा दंड भरल्यानंतरसुद्धा दुसऱ्यांदा पुन्हा जर विनाहेल्मेट दुचाकी चालविताना पोलिसांना आढळून आल्यास १ हजार रुपयांचा दंड तर केला जाईल, मात्र त्यासोबत ३ महिन्यांकरिता लायसन्सदेखील रद्द केले जाणार आहे.

दंड भरा, दुचाकीचा ताबा घ्या...!

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ई-चलान पद्धतीने करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईची थकबाकी मोठी आहे. यामुळे विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांकडून ई चलानद्वारे जागेवर दंड केला जाऊन जोपर्यंत दंडाची रक्कम ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरत नाही, तोपर्यंत दुचाकीचा ताबा दिला जाणार आहे.

वर्षभरात ११६ दुचाकीस्वार ठार

हेल्मेटसक्ती अभियानांतर्गत १नोव्हेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१पर्यंत तब्बल १० हजार ५६१ दुचाकीस्वारांचे समुपदेशन करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात ११६ दुचाकी अपघातात १२४ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १११ दुचाकीचालकांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते.

शहरातील अपघातांमध्ये होणारे दुचाकीस्वारांचे मृत्यू रोखण्यासाठी हेल्मेटसक्ती आता अधिक कठोर केली जात आहे. सर्वांनी हेल्मेटचा वापर करत सुरक्षित प्रवास करावा हा यामागील उद्देश आहे.

-सीताराम गायकवाड, सहायक आयुक्त, वाहतूक शाखा

 

Web Title: No helmets, license revoked and a fine of Rs 500 from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.