रेशनवरील धान्य मिळेना आणि गरीबांचा धान्याचा घोर मिटेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 04:38 PM2020-10-12T16:38:07+5:302020-10-12T16:49:21+5:30

स्वस्त धान्य दुकानातून केशरी कार्ड धारकांना गहु ८ रुपये किलो दराचे व तांदुळ १२ रु पये किलो प्रमाणे मिळत होते. पण गेल्या दोन तीन महिन्यापासून केन्द्र शासनाने हे धान्य बंद केल्याने गरीब अशा केशरी कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याने अशा लोकांची उपासमार होत आहे. यासाठी नगरसेवक स्वप्निल शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे तहसिलदार दीपक गिरासे यांना एक निवेदन देण्यात आले. यात हे धान्य सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

No grain on ration and no food for the poor! | रेशनवरील धान्य मिळेना आणि गरीबांचा धान्याचा घोर मिटेना !

निवेदन देतांना स्विप्नल शेलार कुणाल तथा सनी उगले सुभाष शां.सोनवणे व उल्हास उगले आदी.

Next
ठळक मुद्दे१२ अंकी नंबरच लिहिला नसल्याने अशा कार्ड धारकाला धान्य देण्यास नकार मिळत आहे.

स्वस्त धान्य दुकानातून केशरी कार्ड धारकांना गहु ८ रुपये किलो दराचे व तांदुळ १२ रु पये किलो प्रमाणे मिळत होते. पण गेल्या दोन तीन महिन्यापासून केन्द्र शासनाने हे धान्य बंद केल्याने गरीब अशा केशरी कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याने अशा लोकांची उपासमार होत आहे. यासाठी नगरसेवक स्वप्निल शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे तहसिलदार दीपक गिरासे यांना एक निवेदन देण्यात आले. यात हे धान्य सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
स्वस्त दराने मिळणारे धान्य गरीबांना तेवढाच जगण्याचा आधार होता. पण तेही धान्य कोणालाही पुर्व सुचना न देता बंद करण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे स्वस्त धान्य दुकानदारांनी नेहमीच्या पध्दतीप्रमाणे अगोदर धान्याचे पैसे भरले असतांना देखील अजुन धान्यच आले नाहीत. धान्य बंद करायचे असते तर स्वस्त धान्य दुकानदारांना अगोदर पुर्व सुचनाच दिली असती. म्हणुन तर त्यांनी पैसे भरले.
वास्तविक या केशरी कार्डांवर मागील भट नावाच्या पुरवठा विभागाच्या मुख्य लिपिकाने १२ आकडी नंबर न टाकल्याने प्राधान्याने धान्य पुरवठा असा शिक्का मारलेला नाही. त्यामुळे केशरी कार्ड धारकांना फ्री धान्य देखील मिळत नाही. अशा वेळेस एकीकडे लॉक डाउन कामधंदा नाही. त्र्यंबकेश्वर मंदीर बंद असल्याने दर्शन, धार्मिक विधी बंद अशा परिस्थितीत लोकांनी जगायचे कसे असा मुद्दा तहसिलदार यांना दिलेल्या निवेदन देतांना मांडला. काही ग्राहकांच्या कार्डवर प्राधान्याने धान्य पुरवठा असा शिक्का मारला पण १२ अंकी नंबरच लिहिला नसल्याने अशा कार्ड धारकाला धान्य देण्यास नकार मिळत आहे.
यावेळी तहसिलदारांना निवेदन देतांना कुणाल उगले, सुभाष सोनवणे, उल्हास तुंगार आदी उपस्थित होते.
 
Web Title: No grain on ration and no food for the poor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.