नाशकात ‘नो-कोरोना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:30 PM2020-03-21T23:30:17+5:302020-03-21T23:32:14+5:30

नाशिक : नाशिककरांना बुधवारी (दि.१८) मोठा दिलासा मिळाला, कारण जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना विलगीकरण कक्षात एकही संशयित नव्याने दाखल झाला तर नाहीच, मात्र प्रलंबित असलेल्या चारही संशयितांचे नमुनेही निगेटिव्ह प्राप्त झाले. अद्याप ३१ संशयितांचे नमुने नाशिकमध्ये निगेटिव्ह आले असून कोरोना विलगीकरण कक्ष आता सध्या रिकामा झाला आहे.

'No-corona' in Nashik | नाशकात ‘नो-कोरोना’

आठवडे बाजार ओस : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी प्रतिबंध करण्यात आल्याने शहरातील बुधवार बाजारपेठेतही महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांशी चर्चा करून बाजारात दुकाने न लावण्याची विनंती केली. त्यामुळे बुधवार बाजार असा ओस दिसून येत होता.

Next
ठळक मुद्देनवीन एकही संशयित नाही : सर्वच्या सर्व ३१ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिककरांना बुधवारी (दि.१८) मोठा दिलासा मिळाला, कारण जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना विलगीकरण कक्षात एकही संशयित नव्याने दाखल झाला तर नाहीच, मात्र प्रलंबित असलेल्या चारही संशयितांचे नमुनेही निगेटिव्ह प्राप्त झाले. अद्याप ३१ संशयितांचे नमुने नाशिकमध्ये निगेटिव्ह आले असून कोरोना विलगीकरण कक्ष आता सध्या रिकामा झाला आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतासह महाराष्टÑालाही कवेत घेतले आहे. देशात सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण महाराष्टÑात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई, पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या नाशिकमध्येही जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सतर्कता बाळगत साथरोग कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, मॉल्स एवढेच नव्हे तर आता पान टपरीदेखील बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहे. याबरोबरच लग्न समारंभ, धार्मिक यात्रा, उरुस, सण-उत्सवांच्या निमित्ताने होणारी गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊल टाकले आहे. एकूणच नाशिककरांसाठी अद्याप कुठल्याही प्रकारची सुदैवाने ‘बॅड न्यूज’ कानावर आली नसली तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खबरदारी घेणेही तितकेच क्रमप्राप्त आहे, जेणेकरून नाशिककरांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास अधिकाधिक मदत होईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले. शहर व शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून उपाययोजना अमलात आणणे गरजेचे आहे. पुढील पंधरा दिवस नाशिककरांना अधिकाधिक सतर्क रहावे लागणार आहे.कोरोनाग्रस्त देशांमधून १५२ नागरिक शहरातबुधवारी जिल्हा प्रशासन, मनपा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १२३ नागरिकांचे सर्वेक्षण केले. आतापर्यंत शहरात कोरोनाग्रस्त देशांमधून १५२ नागरिक आले आहेत. त्यापैकी ३१ संशयितांवर जिल्हा शासकीय रु ग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात उपचार पूर्ण करण्यात आले आहेत. या सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले असून, शहरात कोणतीही व्यक्ती अद्याप तरी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेली नाही, असेही जगदाळे म्हणाले.बुधवारी मिळाला मोठा दिलासानवीन एकही संशयित नाही : सर्वच्या सर्व ३१ रुग्णांचे अहवाल निगेटिव्हनाशकात ‘नो-कोरोना’लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिककरांना बुधवारी (दि.१८) मोठा दिलासा मिळाला, कारण जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना विलगीकरण कक्षात एकही संशयित नव्याने दाखल झाला तर नाहीच, मात्र प्रलंबित असलेल्या चारही संशयितांचे नमुनेही निगेटिव्ह प्राप्त झाले. अद्याप ३१ संशयितांचे नमुने नाशिकमध्ये निगेटिव्ह आले असून कोरोना विलगीकरण कक्ष आता सध्या रिकामा झाला आहे.
जगभरात थैमान घालणाºया कोरोना विषाणूने भारतासह महाराष्टÑालाही कवेत घेतले आहे. देशात सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण महाराष्टÑात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई, पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या नाशिकमध्येही जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सतर्कता बाळगत साथरोग कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, मॉल्स एवढेच नव्हे तर आता पान टपरीदेखील बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहे. याबरोबरच लग्न समारंभ, धार्मिक यात्रा, उरुस, सण-उत्सवांच्या निमित्ताने होणारी गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊल टाकले आहे. एकूणच नाशिककरांसाठी अद्याप कुठल्याही प्रकारची सुदैवाने ‘बॅड न्यूज’ कानावर आली नसली तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खबरदारी घेणेही तितकेच क्रमप्राप्त आहे, जेणेकरून नाशिककरांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास अधिकाधिक मदत होईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले. शहर व शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून उपाययोजना अमलात आणणे गरजेचे आहे. पुढील पंधरा दिवस नाशिककरांना अधिकाधिक सतर्क रहावे लागणार आहे.कोरोनाग्रस्त देशांमधून १५२ नागरिक शहरातबुधवारी जिल्हा प्रशासन, मनपा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १२३ नागरिकांचे सर्वेक्षण केले. आतापर्यंत शहरात कोरोनाग्रस्त देशांमधून १५२ नागरिक आले आहेत. त्यापैकी ३१ संशयितांवर जिल्हा शासकीय रु ग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात उपचार पूर्ण करण्यात आले आहेत. या सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले असून, शहरात कोणतीही व्यक्ती अद्याप तरी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेली नाही, असेही जगदाळे म्हणाले.बुधवारी मिळाला मोठा दिलासाआजपर्यंत नाशिककरांना दररोज अमुक नवीन संशयित दाखल अशी माहिती वाचवयास मिळत होती, मात्र बुधवारचा दिवस नागरिकांना मोठा दिलासा देऊन गेला. बुधवारी जिल्हा रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्ष संपूर्णत: रिकामा झाला. तसेच कोणीही नवीन संशयिताने या कक्षात ‘एन्ट्री’ केली नाही आणि आता पुणे प्रयोगशाळेकडे एकाही संशयिताच्या नमुन्यांचा अहवाल प्रलंबितसुद्धा राहिलेला नाही.

 

Web Title: 'No-corona' in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.