शालार्थ आयडी प्रकरणातील निलंबित नितीन बच्छाव अहमदनगरचे शिक्षणाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 04:12 PM2020-07-02T16:12:15+5:302020-07-02T16:16:52+5:30

शालार्थ आयडी प्रकरणात निलंबनाची कारवाई झालेले जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी  तथा प्रभारी शिक्षण उपसंचालक नितिन बच्छाव यांची अहमदनगर येथे शिक्षणाधिकारी (निरंतर) म्हणुन नियुक्ती झाली आहे. त्यांच्यावर शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

Nitin Bachhav, Deputy Director of Education, suspended in the school ID case, Education Officer of Ahmednagar | शालार्थ आयडी प्रकरणातील निलंबित नितीन बच्छाव अहमदनगरचे शिक्षणाधिकारी

शालार्थ आयडी प्रकरणातील निलंबित नितीन बच्छाव अहमदनगरचे शिक्षणाधिकारी

googlenewsNext
ठळक मुद्देनितिन बच्छाव यांची अहमदनगर शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती बच्छाव यांच्याकडेच अजूनही नाशिकच्या कपाटाच्या चाव्या

नाशिक : बनावट शालार्थ आयडी प्रकरणात निलंबनाची कारवाई झालेले जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी  तथा प्रभारी शिक्षण उपसंचालक नितिन बच्छाव यांची अहमदनगर येथे शिक्षणाधिकारी (निरंतर) म्हणुन नियुक्ती झाली आहे. त्यांच्यावर शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु,त्याचा निलंबनाचा कालावझी संपल्याने अप्पर मुख्य संचीव यांनी त्यांना पदावर पुन:स्थापित करण्याच्या सुचना केल्या आहेत. दरम्यान, नाशिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील काही महत्त्वाच्या कापटाच्या चाव्याही अजूनही त्यांच्याकडेच असून या चाव्या मिळविण्यासाठी विद्यमान शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी त्यांना पत्रही दिले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमानुसार बच्छाव यांच्यावरील  निलंबन उठवून त्यांना अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (निरंतर), पदावर पुन:स्थापित करण्याच्या सुचना महाराष्ट्र शासनाच्या अप्पर मुख्य संचीव वंदना कृष्ण यांनी शिक्षण आयुक्त पुणे यांना केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील जल्ह्यातील सहा शाळा आणि नंदुरबार जिल्ह्यातील एका संस्थेतील नऊ शिक्षकांच्या शालार्थ आयडी मान्यतेप्रकरणी प्रकरणी नाशिकचे तत्कालीन प्रभारी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांना निलंबित करण्यात आाले होते. याच कालावधीत बच्छाव यांच्याकडे नाशिकच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच असल्याने या कार्यालयातील काही महत्वाच्या कपाटांच्या चाव्या अजूनी त्यांच्याकडेच असून त्यांनी या चाव्या विद्यमान शिक्षणाधिकारी यांच्याकडे सुपर्द केलेल्या नाही. त्यामुळे विद्यमान शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी त्यांना चाव्या सुपर्द करण्यासाठी पत्राद्वारे सुचित करण्यात आल्याची माहिती दिली आहे.  

कामकाज रखडले
लॉकडाऊन काळात रखडलेली शालार्थ आयडीचे काम तसेच तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांच्यावर झालेल्या कारवाई झाल्यानंतर प्रलंबित राहिलेल्या मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व शिक्षकांच्या पद्दोन्नती, भविष्य निर्वाहनिधी आणि विविध प्रकारची रखडलेली आहे. त्याचप्रमाणे शालार्थ आयडीसह, संचमान्यता, डीएड ते बीएच मान्यता संदर्भातील विविध नस्ती अडकून पडल्या आहेत. 

Web Title: Nitin Bachhav, Deputy Director of Education, suspended in the school ID case, Education Officer of Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.