ओझरला निर्भया कन्या अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 03:49 PM2020-02-18T15:49:03+5:302020-02-18T15:49:30+5:30

ओझर: येथील मराठा विद्यासमाज संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात निर्भया कन्या अभियान कार्यशाळा संपन्न झाली. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी यात मार्गदर्शन केले.

 Nirbhaya Kanya campaign to Ozar | ओझरला निर्भया कन्या अभियान

ओझर येथील महाविद्यालयात निर्भया कन्या अभियान कार्यशाळे प्रसंगी मोह म्मद अर्षद खान यांचा सत्कार करताना प्राचार्य प्रा.डॉ. संभाजी पाटीलसमवेत मोह म्मद आरिफ खान व डॉ. रूपेश गुजर,

googlenewsNext
ठळक मुद्दे यावेळी मार्क मार्शल आटर्सचे मोह म्मद आरिफ खान म्हणाले की, कोणत्याही कठीण प्रसंगी डगमगून न जाता आत्मविश्वासाने सामोरे जावे. यासाठी आपले व्यक्तिमत्व घडवा,स्वसंरक्षण करण्याची तयारी ठेवा. स्वसंरक्षणाचे धडे घेण्याचीही तयारी दाखवा असे खान यांनी विद्यार्थिनींना

यावेळी अ‍ॅड. चारूशिला खैरनार यांनी मुलींच्या बाजुने असलेल्या कायद्यांची माहिती दिली. तर गायत्री जाधव यांनी शारिरीक तंदुरूस्तीचे महत्व सांगून कठीण प्रसंगी लढा देण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. संभाजी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय भारती भंगाळे यांनी करून दिला. डॉ. सुजाता पाटील यांनी आभार मानले. सूंत्रसंचालन डॉ. छाया शिंदे यांनी केले. यावेळी मार्क मार्शल आर्ट्सच्या सानिया खान, मुस्कान खान,व एस.गोप कुमार, मोह म्मद अर्षद खान यांनी विद्यार्थिनींना कोणी हल्ला केल्यास त्याच्या तावडीतून कसे सुटायचे याबाबत प्रात्याक्षिक दाखविले. याप्रसंगी डॉ. रूपेश गुजर, प्रा. संजयकुमार संमतराय आदि उपस्थित होते. (18ओझर निर्भया कन्या)
ओझर: येथील महाविद्यालयात निर्भया कन्या अभियान कार्यशाळे प्रसंगी मोह म्मद अर्षद खान यांचा सत्कार करताना प्राचार्य प्रा.डॉ. संभाजी पाटीलसमवेत मोह म्मद आरिफ खान व डॉ. रूपेश गुजर,


ओझरला निर्भया कन्या अभियान
ओझर: येथील मराठा विद्यासमाज संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात निर्भया कन्या अभियान कार्यशाळा संपन्न झाली. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी यात मार्गदर्शन केले.
यावेळी मार्क मार्शल आटर्सचे मोह म्मद आरिफ खान म्हणाले की, कोणत्याही कठीण प्रसंगी डगमगून न जाता आत्मविश्वासाने सामोरे जावे. यासाठी आपले व्यक्तिमत्व घडवा,स्वसंरक्षण करण्याची तयारी ठेवा. स्वसंरक्षणाचे धडे घेण्याचीही तयारी दाखवा असे खान यांनी विद्यार्थिनींना सांगितले. यावेळी अ‍ॅड. चारूशिला खैरनार यांनी मुलींच्या बाजुने असलेल्या कायद्यांची माहिती दिली. तर गायत्री जाधव यांनी शारिरीक तंदुरूस्तीचे महत्व सांगून कठीण प्रसंगी लढा देण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. संभाजी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय भारती भंगाळे यांनी करून दिला. डॉ. सुजाता पाटील यांनी आभार मानले. सूंत्रसंचालन डॉ. छाया शिंदे यांनी केले. यावेळी मार्क मार्शल आर्ट्सच्या सानिया खान, मुस्कान खान,व एस.गोप कुमार, मोह म्मद अर्षद खान यांनी विद्यार्थिनींना कोणी हल्ला केल्यास त्याच्या तावडीतून कसे सुटायचे याबाबत प्रात्याक्षिक दाखविले. याप्रसंगी डॉ. रूपेश गुजर, प्रा. संजयकुमार संमतराय आदि उपस्थित होते.  

Web Title:  Nirbhaya Kanya campaign to Ozar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.