निफाडचा पारा सहा अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 02:57 PM2020-01-30T14:57:38+5:302020-01-30T14:57:49+5:30

निफाड : तालुक्यात तापमानाचा पारा आणखी घसरला असून गुरूवारी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात सहा अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा तालुका कडाक्याच्या थंडीने पूर्णपणे गारठून गेला होता.

 Niphad mercury at six degrees | निफाडचा पारा सहा अंशांवर

निफाडचा पारा सहा अंशांवर

Next

निफाड : तालुक्यात तापमानाचा पारा आणखी घसरला असून गुरूवारी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात सहा अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा तालुका कडाक्याच्या थंडीने पूर्णपणे गारठून गेला होता. ९ जानेवारी रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ८.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. १० जानेवारी रोजी ९ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यानंतर
१६ जानेवारी रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती आणि अवघ्या एक दिवसाच्या अंतराने सात अंश सेल्सिअसने तापमान कमी होऊ शुक्र वारी १७ जानेवारी २.४अंश इतक्या कमी तापमानाची नोंद झाली त्यामुळे कडाक्याच्या थंडीने अवघ्या निफाड तालुका गारठून गेला होता. त्यानंतर मात्र थंडीचे प्रमाण कमीकमी होत जाऊन ऊन वाढत गेल्याने उष्म्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे काही प्रमाणात उन्हाचे चटके बसू लागले होते व घराघरातील पंखे वेगाने फिरू लागले होते. परंतु १३ दिवसाच्या विश्रांतीनंतर गेल्या तीन ते चार दिवसापासून थंडी वाढत जाऊन गुरु वारी दि ३० रोजी जानेवारी रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात सहा अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. अवघा निफाड तालुका कडाक्याच्या थंडीने पूर्णपणे गारठून गेला. सकाळी गार वारा सुटल्यामुळे थंडीचा सामना करावा लागला. नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या बोचऱ्या थंडीमुळे तालुक्यात दिवसभर गारवा जाणवत होता. त्यामुळे नागरिकांना दिवसभर स्वेटरचा वापर करावा लागला. निफाडमध्ये चहाच्या टपर्यावर गर्दी होती. सकाळी भरणार्या शाळांमध्ये विद्यार्थी शाळेत थंडीमुळे उशिरा आले. ही थंडी कांदा, गहू पिकाला पोषक ठरणार आहे मात्र या वाढत जाणाºया कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची शक्यता वाढल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत पडले आहे.

Web Title:  Niphad mercury at six degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक