निफाडला सलग दुसर्या दिवशी कडकडीत लॉगडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:37 PM2020-03-31T17:37:49+5:302020-03-31T17:40:12+5:30

निफाड : तालुक्यात कोरोनाचा संशियत रु ग्ण जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याचा पाशर््वभूमीवर निफाड शहरात सलग दुसर्या दिवशी मंगळवार दि 31 रोजी कडकडीत लॉगडाऊन पाळण्यात आला तसेच निफाड परिसरातील गावामध्ये सतर्कता बाळगण्यात येत असून सर्वत्र शुकशुकाट दिसून आला

Niphad a hard logdown for another day in a row | निफाडला सलग दुसर्या दिवशी कडकडीत लॉगडाऊन

निफाड शहरात छोट्या ब्लोअर ट्रॅक्टरने औषध फवारणी होतांना.

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात सर्वत्र शुकशुकाट पसरला

निफाड : तालुक्यात कोरोनाचा संशियत रु ग्ण जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याचा पाशर््वभूमीवर निफाड शहरात सलग दुसर्या दिवशी मंगळवार दि 31 रोजी कडकडीत लॉगडाऊन पाळण्यात आला तसेच निफाड परिसरातील गावामध्ये सतर्कता बाळगण्यात येत असून सर्वत्र शुकशुकाट दिसून आला हा कडकडीत लॉगडाऊन निफाड शहरात पाळण्यात येत आहे.
निफाड शहरात सलग दुसर्या दिवशी मंगळवार दि 31रोजी कडकडीत लॉगडाऊन पाळण्यात आला. शहरातील दवाखाने व मेडिकल वगळता सर्व दुकाने कडकडीतपणे बंद ठेवण्यात आली होती. फक्त सकाळी 10 पर्यंत दूध विक्र ीला परवानगी देण्यात आलेली होती. या कडकडीत लॉगडाऊनमुळे निफाड शहरातील सर्व भाग निर्मनुष्य झाले होते. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पसरला होता सलग दुसर्या दिवशी डेली भाजीपाला बाजार बंद असल्याने या बाजारात शुकशुकाट होता नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी मातोश्री जसोदाबाई सोनी विकास व सेवा केंद्र व निफाड नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहकांना माफक दरात थेट घरपोच भाजीपाला देण्याचा उपक्र म चालू ठेवण्यात आला होता. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर मंगळवारी निफाड शहरात निफाड नगरपंचायतीच्या वतीने छोट्या ब्लोअर ट्रॅक्टरने औषध फवारणी करण्यात आली.
मंगळवारी खेड्यापाड्यातही नागरिक घराबाहेर निघणे टाळत होते व काळजी घेत होते जे नागरिक महत्वाच्या कामासाठी बाहेर पडले त्या सर्वानी मास्कचा वापर केला होता जळगांव फाटा येथे कादवा किनारी असलेल्या वस्तीत राहणार्या नागरिकांनी सिमेंटचे पाईप लावून रस्ता बंद केला होता तर नांदूरमध्यमेश्वर, नैताळे, धारणगाव वीर, येथे कडकडीत लॉगडाऊन पाळण्यात आला. निफाड पोलिसांनी पिंपळस रामाचे, उगाव, नैतीळे येथेही पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
निफाड पोलिसांनी शांतीनगर त्रिफुली येथे बॅरिकेट्स लावून चोख बंदोबस्त ठेवला होता सोमवारी दि 30 रोजी निफाड पोलिसांनी रस्त्यावर विनाकारण फिरणार्या 4 जणांवर गुन्हा दाखल केला तर 4 वाहन चालकांवर कारवाई केली व 1000 रु दंड वसूल केला पिंपळस रामाचे, उगाव, नैतीळे येथेही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Niphad a hard logdown for another day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.