नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीसाठी भाजपाकडून उध्दव निमसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 03:38 PM2019-07-17T15:38:21+5:302019-07-17T15:40:46+5:30

नाशिक- महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपाने अखेरीस सहा इच्छुकांपैकी उध्दव निमसे यांना उमेदवारी दिली असून गेल्या अनेक दिवसांपासून प्रबळ दावेदार मिळणाऱ्या गणेश गिते यांचा पत्ता कट केला आहे. बुधवारी (दि.१७) निमसे यांनी महापौरांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.

Nimse from BJP for standing committee for Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीसाठी भाजपाकडून उध्दव निमसे

नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीसाठी भाजपाकडून उध्दव निमसे

Next
ठळक मुद्देगणेश गितेंचा पत्ता कटशिवसेनेच्या कल्पना पांडे यांनी दिले भाजपाला आव्हान

नाशिक- महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपाने अखेरीस सहा इच्छुकांपैकी उध्दव निमसे यांना उमेदवारी दिली असून गेल्या अनेक दिवसांपासून प्रबळ दावेदार मिळणाऱ्या गणेश गिते यांचा पत्ता कट केला आहे. बुधवारी (दि.१७) निमसे यांनी महापौरांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.

निमसे यांना अन्य विरोधी पक्षांनी आव्हान दिले नसले तरी सत्तारूढ भाजपाच्या मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनेच आव्हान देण्याचा प्रयत्न केला असून या पक्षाच्या कल्पना पांडे यांनी अर्ज दाखल केला आहे.

स्थायी समिती आणि अन्य विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणूका गुरूवारी (दि. १८) होणार आहेत. सर्वाधिक महत्त्वाच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपात सर्व प्रथम गणेश गिते यांची दावेदारी बळकट मानली जात होती. पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांचे नाव जोरात असले तरी अन्य इच्छुकांनी त्यांच्या स्तरावर तयारी केली होती. भाजपाच्या वतीने उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी एकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी (दि.१७) सकाळी साडे अकरा वाजता पक्षाने गणेश गिते, उध्दव निमसे आणि स्वाती भामरे या तिघांना अर्ज भरून ठेवण्यास सांगितले आणि त्यानंतर दुपारी एक वाजता उमेदवारी दाखल करण्यास दहा मिनीटे बाकी असताना निमसे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

Web Title: Nimse from BJP for standing committee for Nashik Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.