निमगाव-सिन्नरला श्रीकृष्ण पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 07:16 PM2021-01-22T19:16:34+5:302021-01-23T00:53:36+5:30

सिन्नर : तालुक्यातील निमगाव-सिन्नर येथील ग्रामपंचायतीच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत श्रीकृष्ण परिवर्तन व रोकडेश्वर ग्रामविकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. त्यात श्रीकृष्ण परिवर्तनने ११ पैकी ७ जागांवर विजय मिळविताना ग्रामपंचायतीवर झेंडा रोवला आहे. विरोधी रोकडेश्वर ग्रामविकासला केवळ ४ जागा मिळाल्या.

Nimgaon-Sinnar dominated by Shrikrishna panel | निमगाव-सिन्नरला श्रीकृष्ण पॅनलचे वर्चस्व

निमगाव-सिन्नरला श्रीकृष्ण पॅनलचे वर्चस्व

Next
ठळक मुद्दे सात जागा जिंकल्या : प्रतिस्पर्धी रोकडेश्वर ग्रामविकास पॅनलला केवळ ४ जागा

विकास सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी शेळके, माजी सरपंच बाळासाहेब सानप, जयसिंग नागरे, प्रकाश सानप, प्रकाश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली व बाजार समितीचे संचालक दत्तात्रय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. दुसरीकडे पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन सानप, माजी चेअरमन चांगदेव सानप, अमृता सांगळे, बाजार समितीचे माजी उपसभापती काशिनाथ सानप, माजी सरपंच संजय सानप यांच्या नेतृत्वाखाली रोकडेश्वर पॅनल उभा करण्यात आला होता. सरळ लढतीत श्रीकृष्ण पॅनलची सरशी झाली.
या पॅनलच्या सात विजयी उमेदवारांमध्ये रंजना नाना सानप (३३५), शिवाजी शेळके (३६१), सुमन नागरे (३०३), संगीता वनवे (२८०), चंद्रकला गुंजाळ (१७५), जयश्री चंद्रमोरे (१६७), सुनंदा आव्हाड (१२७) यांचा समावेश आहे. तर विरोधी पॅनलच्या ४ विजयी उमेदवारांमध्ये दशरथ सानप (२७०), मंगेश सानप (३७६), शांताराम सानप (३८७), वैशाली सानप (४६६) यांचा समावेश आहे, तर श्रीकृष्ण पॅनलच्या नेते, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. मंदिराच्या सभामंडपात विजयी सभा घेण्यात आली. गावाच्या विकासासाठी यापुढेही प्रयत्न करण्याचा संकल्प सोडण्यात आला.
नेत्यांच्या घरातील उमेदवार पराभूत
विरोधी रोकडेश्वर ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व करणाऱ्या स्थानिक नेत्यांच्या घरातील उमेदवारांचा सपाटून पराभव झाला. त्यात सुनीता अमृता सांगळे, मंगल संजय सानप, कुसुम कैलास सांगळे, सुजाता संजय सानप यांचा समावेश आहे. नेत्यांच्या घरातील उमेदवारांचा पराभव झाल्याने पॅनलचा धुव्वा उडाल्याचे बघायला मिळाले. आता विजयी पॅनलच्या नजरा सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे.

Web Title: Nimgaon-Sinnar dominated by Shrikrishna panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.